Home /News /entertainment /

रणवीरच्या शर्टलेस फोटोवर दीपिकाच्या कमेंट; हॉट ट्रान्सफॉर्मेशनची सोशल मीडियावर चर्चा

रणवीरच्या शर्टलेस फोटोवर दीपिकाच्या कमेंट; हॉट ट्रान्सफॉर्मेशनची सोशल मीडियावर चर्चा

रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' चित्रपटात रणवीर भूमिका साकारणार असून त्यासाठीचा हा लूक असल्याचं बोललं जात आहे. यासाठी रणवीर सतत वर्कआउट सेशन्स करत असून चाहत्यांमध्ये त्याच्या या हॉट ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा आहे.

  मुंबई, 10 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या पत्नीच्या अर्थात दीपिकाच्या फोटोवर मजेशीर, रोमॅन्टिक कमेंट करून अनेकदा चर्चेत असतो. पण आता रणवीरच्या एका फोटोमुळे, त्या फोटोवरील कमेंटमुळे दोघेही चर्चेत आहेत. रणवीरने त्याचा एक शर्टलेस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांसह दीपिकानेही त्यावर कमेंट केली आहे. जवळपास 24 तासांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टवर, रणवीरच्या चाहत्यांसह दीपिकानेही एकामागे एक दोन कमेंट केल्या आहेत. रणवीरच्या या डस्की लूकला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' चित्रपटात रणवीर भूमिका साकारणार असून त्यासाठीचा हा लूक असल्याचं बोललं जात आहे. यासाठी रणवीर सतत वर्कआउट सेशन्स करत असून चाहत्यांमध्ये त्याच्या या हॉट ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा आहे. रणवीर आगामी यश राज फिल्म्सच्या कॉमेडी-ड्रामा 'जयेशभाई जोरदार' मध्येही भूमिका साकारणार आहे. त्याशिवाय करण जोहरच्या 'तख्त' आणि '83' मधूनही रणवीर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. '83' एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता, परंतु लॉकडाउनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. सध्या डिसेंबर 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.
  View this post on Instagram

  Down & Dirty ⛓ #mondaymotivation

  A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

  दुसरीकडे, दीपिका पदुकोण शकुन बन्ना यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच तिने गोव्यात या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Bollywood, Deepika padukone, Ranveer singh

  पुढील बातम्या