मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा BTS व्हिडिओ व्हायरल; रणवीर-आलियाच्या केमिस्ट्रीची रंगलेय चर्चा

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा BTS व्हिडिओ व्हायरल; रणवीर-आलियाच्या केमिस्ट्रीची रंगलेय चर्चा

 'गली बॉय'नंतर रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्टची (Alia Bhatt) जोडी पुन्हा एकदा धमाल करायला सज्ज झाली आहे. दोघे करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)' या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 29 नोव्हेंबर: 'गली बॉय'नंतर रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्टची (Alia Bhatt) जोडी पुन्हा एकदा धमाल करायला सज्ज झाली आहे. दोघे करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)' या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. अलीकडेच या चित्रपटातील रणवीर आणि आलियाचे फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये दोघेही दिल्लीतील कुतुबमिनार येथे शूटिंग करताना दिसले होते. या दोघांसोबत दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar, शबाना आझमी (Shabana Azmi) आणि धर्मेंद्र धर्मेंद्र (Dharmendra) देखील दिसले होते आणि आता या चित्रपटाचा बीटीएस व्हिडिओ व्हायरल होत आहे.

चित्रपटाच्या पहिल्या 50 दिवसांचे शूटिंग पूर्ण झाले असून यासोबतच धर्मा प्रोडक्शनने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. चित्रपटाच्या बीटीएस व्हिडिओमध्ये, रणवीर-आलिया यांच्यातील रोमँटिक आणि सिझलिंग केमिस्ट्रीचा हिंट मिळत आहे. या दोघांचा रोमँटिक अंदाड पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे.

वाचा :नेहा पेंडसेच्या वाढदिवसाच्या पार्टीत पती शार्दूलने असं काही केलं ज्यामुळं... Video व्हायरल 

व्हिडिओमध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्यातील केमिस्ट्री स्पष्ट दिसत आहे. बीटीएस व्हिडिओमध्ये आलिया भट्ट पांढऱ्या स्लीव्हलेस ब्लाउज आणि हिरव्या साडीमध्ये दिसत आहे. तसेच यामध्ये असा एक शॉट आहे. जो पाहून जया बच्चन यांच्या 'कभी खुशी कभी गम'मधील आरतीचा आयकॉनिक सीन डोळ्यापुढे आल्याशिवाय राहत नाही.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

या व्हिडिओवरून अंदाज लावला जात आहे की, यामध्ये प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन आणि भरपूर रोमान्स, ड्रामा पाहायला मिळणार आहे. अनेक ठिकाणी करण रणवीर-आलियासह इतर स्टार्सना सीन समजावून सांगताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.

वाचा : पहिल्या शेवंताच्या तुलनेत नव्या अभिनेत्रीत काय आहे खास? UK मधून शिक्षण आणि...

'रॉकी आणि राणीच्या लव्हस्टोरी'चे काही भाग दिल्लीत शूट करण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपटाचे स्टार्स काही काळ संपूर्ण टीमसोबत दिल्लीत आहेत. ज्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोंमध्ये आलिया, रणवीर, शबाना आझमी, धर्मेंद्र आणि करण जोहर दिसत होते.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranveer sigh