मुंबई, 24 डिसेंबर: बॉलीवूडचा (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते रणजीत (Actor Ranjeet) यांना आपण आतापर्यंत असंख्य चित्रपटांत (Films) केवळ खलनायकाची (villain) भूमिका (Role) साकरताना पाहिलं आहे. काही अपवाद वगळले तर त्यानं जवळपास सगळ्या चित्रपटांत खलनायकाचीच भूमिका निभावली आहे. आजही तो एखाद्या कार्यक्रमात जातो, तेव्हा त्याच्या खलनायकाच्या भूमिकांचीच नकल केली जाते. यावरून रणजीत एक खलनायक म्हणून दर्शकांच्या मनावर किती बिंबवला गेला आहे, हे लक्षात येतं. पण तो आता आपल्याला एका कॉमेडी वेब सीरीजमध्ये (Comedy web series) दिसणार आहे. यामधून दर्शकांना रणजीतची अभिनयाची एक वेगळी झलक पाहायला मिळणार आहे.
या कॉमेडी वेब सीरीजचं नाव "बेचारी" (Becharey) असं असून या सीरीजमध्ये अमिता यादव, प्रितीक चौधरी, संभव जैन, हिमांशू भट्ट आणि राहुल दत्ता हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. "माझ्याकडे सध्या वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स आणि कथा पडून आहेत. पण मला प्रथम एपिसोडीक मालिका करावीशी वाटली. आताच्या पिढीचं जगणं वेगळं आहे, आणि त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. यावरचं अधारित ही वेब सीरीज आहे. नव्या पिढीच्या या कथेत मला तरुण, प्रतिभावान आणि उत्साही टीमबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि यांच्यासोबत काम करायला खुप मजा येत आहे. ही एक कॉमेडी वेब सीरीज असल्यानं सृजनशिलतेला भरपूर वाव आहे," असं ज्येष्ठ अभिनेता रणजीत यांनी सांगितलं.
रणजीतला आपण आतापर्यंत वेलकम आणि हाऊसफुल्ल-4 मध्ये विनोदी भुमिका साकारताना पाहिलं आहे. पण बेचारी ही वेब सीरीज चार मुलं आणि एक मुलगी यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकणारी मालिका आहे. या कथेत एक घर आहे. जिथे काही लोकं पेईंग गेस्ट म्हणून राहायला येत असतात.
या वेब सीरीजमध्ये रणजीतने स्वतःचीच भूमिका साकारली आहे. तो राहण्यासाठी घर शोधत असतो, तेव्हा घराचा मालक त्याला त्या घरात राहायला पाठवतो. जिथे अगोदरपासूनच काही मुलं मुली राहत आहेत. येथून खऱ्या अर्थानं विनोदी मेजवानी सुरू होते. खलनायकाचं वलय असलेलं रणजीतचं हे पात्र त्या घरात कसं राहतं, आणि त्यानंतर होणारी कमाल, धम्माल आपल्याला या वेब सीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.