मुंबई, 28 मे- अनेकदा कलाकार अशी काही विधानं करतात, की ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकतात. बॉलिवूड(Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) देखील असचं काहीसं केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. इतकचं नव्हे तर रणदीप हुड्डाला अटक करण्याची देखील मागणी ट्विटर(Twitter) वर होतं आहे. रणदीप हुड्डाने आपल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये राजकीय नेता मायावती (Mayawati) यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. हे विधान ऐकून काही नेटकरी संतापले अन् त्यांनी रणदीपच्या अटकेची मागणी केली आहे.
अभिनेता रणदीप हुड्डाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ समोर येताच लोकांना धक्का बसला आहे. कारण रणदीपने या व्हिडिओमध्ये एका राजकीय महिलेबद्दल वादग्रस्त शब्दात विनोद केला आहे.
if this does not explain how casteist and sexist this society is, especially towards dalit women, i don’t know what will. the “joke”, the audacity, the crowd. randeep hooda, top bollywood actor talking about a dalit woman, who has been the voice of the oppressed. pic.twitter.com/lVxTJKnj53
— Agatha Srishtie 🌸 please DM with SOS tweets (@SrishtyRanjan) May 25, 2021
(हे वाचा: धर्मा' नंतर कार्तिक आर्यन शाहरुख खानच्या 'रेड चिलीज' मधूनही बाहेर, केला खुलासा)
रणदीपच्या या डर्टी जोकमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत. अनेक युजर्स ट्वीट करत रणदीपला अरेस्ट करण्याची मागणी करत आहेत. त्याचबरोबर लवकरात लवकर रणदीपने माफी मागवी अशी मागणी होत आहे. लोकांना विश्वास बसत नाहीय, की एका महिलेवर रणदीप इतका हीन विनोद कसा करू शकतो.
(हे वाचा:मिस मॅच' फेम मराठमोळ्या मृण्मयी कोलवलकरचा हॉट फोटोशूट, PHOTO पाहून चाहते सैराट )
यापूर्वीसुद्धा कॉमेडियन अबिश मैथ्यूने मायावती यांच्यावर अशीच सेक्सिस्ट कमेंट केली होती. त्यावेळी सुद्धा लोकांना राग अनावर झाला होता. त्यानंतर त्यानेसुद्धा माफी मागितली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor