रणदीप हुड्डाच्या आजीचं निधन, अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट

रणदीप हुड्डाच्या आजीचं निधन, अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट

रणदीपने इन्स्टाग्रामवर आपला आजीसोबतचा फोटो शेअर करत आजीच्या आठवणींना उजाळा दिला.

  • Share this:

मुंबई, 27 मे- आज बॉलिवूडसाठी काळा दिवस आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अजय देवगणला पितृशोक झाला. स्टंट दिग्दर्शक वीरू देवगण यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झालं. तर अभिनेता रणदीप हुडाच्या आजीचेही निधन झाले. रणदीपने इन्स्टाग्रामवर आपला आजीसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, ‘माझ्या आजीचं निधन झालं. तिने ९७ वर्ष नेहमी प्रेम, हिंमत आणि हसू दिलं. तिच्या आत्म्याला शांती मिळो.’

रणदीपचे चाहते त्याच्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली देत त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्याची प्रार्थना करत आहेत. रणदीप मुळचा हरियाणाच्या रोहतक येथील आहे. त्याने २०११ मध्ये मान्सून वेडिंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रणदीपने आतापर्यंत साहेब बीवी और गँगस्टर, कॉकटेल, सरबजीत, हायवे, किक, लाल रंग आणि सुल्तान अशा एकाहून एक हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.

दरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक आणि अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचं आज दुपारी निधन झालं. वीरू यांच्या निधनाची वार्ता कळताच अनेक बॉलिवूड स्टार अजय आणि काजोलचं सांत्वन करायला त्यांच्या घरी गेले. वीरू यांनी लाल बादशाह, इश्क, दिलवाले, मिस्टर इंडियासारख्या सिनेमांचे स्टंट डिरेक्ट केले होते.

राज्यात मान्सून लांबण्याची शक्यता, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: May 27, 2019, 7:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading