मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia Bhatt Baby Bump : रणबीरला पाहताच मोठ्याने 'बेबी' ओरडली अन्..., पाहा VIDEO

Alia Bhatt Baby Bump : रणबीरला पाहताच मोठ्याने 'बेबी' ओरडली अन्..., पाहा VIDEO

आलियाचं बेबी बंप (Alia Baby Bumb)पाहून अशी होती रणबीरची प्रतिक्रिया, पाहा व्हायरल VIDEO

आलियाचं बेबी बंप (Alia Baby Bumb)पाहून अशी होती रणबीरची प्रतिक्रिया, पाहा व्हायरल VIDEO

आलियाचं बेबी बंप (Alia Baby Bumb)पाहून अशी होती रणबीरची प्रतिक्रिया, पाहा व्हायरल VIDEO

  मुंबई, 10 जुलै : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt)सध्या अनेक कारणांरुन चर्चेत आहे. एकतर ती गरोदर (alia bhatt pregnancy)आहे आणि दुसरी म्हणजे ती लवकरच हाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. फक्त बाॅलिवूड नव्हे तर आता हाॅलिवूडमध्येही आपली छाप पाडायला आलिया सज्ज झाली आहे. आलिया भट्टनं तिच्या पहिल्या वहिल्या हाॅलिवूड चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आलियानं हॉलिवूड डेब्यू (Alia hollywood debut)चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'चे शूटिंग पूर्ण(alia complete shooting Heart of stone) होताच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. आलियानं पोस्टच्या शेवटी खास रणबीरसाठी लिहिलं आहे की, 'आता मी घरी येत आहे बेबी'. 'हार्ट ऑफ स्टोन'चे शूटिंग संपवून शनिवारी रात्री आलिया लंडनहून मुंबईला परतली. रात्री उशीरा आल्यामुळे आणि त्यात गर्भवती असल्यामुळे अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) पत्नीला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचला. यावेळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे. हेही वाचा -  Koffee With Karan 7: आमिर खान- शाहरुख खान दिसणार एकत्र? करण जोहरने केला खुलासा आलिया रणबीर कपूरला पाहून खूपच आनंदी झाल्याचं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून पहायला मिळतंय. रणबीरला पाहताच आलिया मोठ्यानं 'बेबी' असं ओरडली आणि पळत गाडीमध्ये चढून रणबीरला मिठी मारली. रणबीरनंही आलियाचं बेबी बंप (Alia Bhatt Baby Bumb)पाहून तिला घट्ट मिठी मारली. रणबीर आलियाचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत असलेला पहायला मिळतोय.
  दरम्यान, आलिया गरोदर असल्यामुळे सगळ्यांच्याच नजरा तिच्या बेबी बंपवर खिळल्या आहेत. आलियाच्या लग्नाला तीन महिनेही पूर्ण झाले नाहीत आणि अशा परिस्थितीत एवढा मोठा बेबी बंप पाहून लग्नापूर्वीच ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सर्वजण करत आहेत.
  रणबीरनं मागे एका मुलाखतीमध्ये आलियाच्या प्रेग्नेंसीवर भाष्य केलं होतं. 'हा काळ माझ्यासाठी खूप खास आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. आलिया आणि मी विवाहित आहोत आणि आम्हाला प्रेग्नेंसीबद्दल सांगणे योग्य वाटले त्यामुळे आम्ही हा आनंद सगळ्यांसोबत शेअर केला.'
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Alia Bhatt, Bollywood, Entertainment, Pregnancy, Ranbir kapoor, Video viral

  पुढील बातम्या