चेक बाऊंस प्रकरणी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला तीन महिन्यांचा तुरुंगवास

चेक बाऊंस प्रकरणी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला तीन महिन्यांचा तुरुंगवास

इंदौरस्थित सुरेंदर सिंह यांच्याकडून खाजगी कामासाठी पाच लाख रुपये उधार घेतले होते

  • Share this:

नवी दिल्ली, ३१ नोव्हेंबर २०१८- चेक बाऊंस प्रकरणी बॉलिवूडचा अभिनेता राजपाल यादवला दिल्ली हायकोर्टाने तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ट्रायल कोर्टाच्यासमोर ठरवून दिलेली रक्कम देण्यास राजपाल असमर्थ ठरल्याने कोर्टाने त्याला तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

इंदौरस्थित सुरेंदर सिंह यांच्याकडून खाजगी कामासाठी पाच लाख रुपये उधार घेतले होते. ही रक्कम परत देताना राजपालने मुंबईतील अक्सिस बँकेचा चेक सुरेंदर सिंहला दिला होता. सप्टेंबर २०१५ हा चेक बँकेत जमा केल्यावर तो बाऊंस झाला. यानंतर सुरेंदरने सिंहने वकिलांच्यामार्फत यादवला यासंबंधी नोटीस पाठवली. नोटीस मिळूनही यादवने पाच लाख रुपये भरले नाही. शेवटी सिंह यांनी राजपालला न्यायालयात खेचत त्याच्याविरुद्ध केस दाखल केली.

VIDEO: रेल्वेखाली आत्महत्या करायला गेलेल्या आईचा मुलीने असा वाचवला जीव

First published: November 30, 2018, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading