Home /News /entertainment /

Rajkumar rao गर्लफ्रेंड Patralekha सोबत बांधणार लगीनगाठ; 'या' दिवशी होणार विवाहसोहळा

Rajkumar rao गर्लफ्रेंड Patralekha सोबत बांधणार लगीनगाठ; 'या' दिवशी होणार विवाहसोहळा

बॉलिवू़डमध्ये यंदा लगीनघाई जोरात दिसत आहे. कारण आता आलिया व रणबीर कपूर नंतर बॉलीवूडअभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या बातमीनुसार, राजकुमार राव लवकरच गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत (Patralekha) लग्नगाठ बांधणार आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 30 ऑक्टोबर ; बॉलिवू़डमध्ये यंदा लगीनघाई जोरात दिसत आहे. कारण आता आलिया व रणबीर कपूर नंतर बॉलीवूडअभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या बातमीनुसार, राजकुमार राव लवकरच गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत (Patralekha) लग्नगाठ बांधणार आहे. यंदाच्या वर्षे ही दोघ (Rajkummar Rao Patralekha Wedding) लग्नाच्या बंधनात असल्याची चर्चा रंगली आहे. यंदा 10 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नात यांचे काही जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. पत्रलेखा आणि राजकुमार राव यांनीही त्यांच्या जवळच्या व्यक्तींना लग्नाचे आमंत्रण पाठवण्यास सुरुवात केली आहे. ई-टाईम्सच्या वृत्तानुसार, लग्नाची तारीख निश्चित झाली असून जवळच्या व्यक्तींना निमंत्रण पत्रे पाठवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पत्रलेखा आणि राजकुमार राव मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सात फेरे घेणार आहेत. वाचा , Jr. NTR ला बिलगून रडला Puneeth चा मोठा भाऊ; फोटो पाहून पाणावतील डोळे दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे लव्हबर्ड्स एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यास कधीच कमी पडत नाहीत. सोशल मीडियावरही राजकुमारने अनेकदा आपल्या लेडीलव्ह म्हणजे चित्रलेखाविषयी प्रेम व्यक्त केले आहे. दोघेही सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट शेअर करताना आणि एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले आहेत.
  राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नाची चाहतेही बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अशा परिस्थितीत आता त्यांच्या लग्नाची बातमी समोर येत आहे. तेव्हा या जोडप्याच्या लग्नाची बातमी चाहत्यांसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही, असेच म्हणावे लागेल. जरी, राजकुमार त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कधीही चर्चा करत नसला. मात्र पत्रलेखावरील प्रेम व्यक्त करण्यास देखील तो मागे हटत नाही. वाचा , Ananya Panday: 23 वर्षांची अनन्या पांडे आहे कोट्यधीश, संपत्ती ऐकून बसेल धक्का राजकुमार राव सध्या क्रिती सेननसोबत त्याच्या आगामी 'हम दो हमारे दो' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दोघेही नुकतेच अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिसले होते. यावेळी राजकुमार रावने त्याच्या दिवंगत आईची शेवटची इच्छा देखील व्यक्त केली होती. ज्याचा अमिताभ बच्चन यांच्याशी संबंध होता.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या