मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Raj Kundra Case: आर. माधवनचा शिल्पा शेट्टीला पाठींबा; कमेंट करत म्हटलं...

Raj Kundra Case: आर. माधवनचा शिल्पा शेट्टीला पाठींबा; कमेंट करत म्हटलं...

मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या(Shilpa Shetty) पतीला अटक केली आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रावर (Raj Kundra Pornography Case) पोर्नोग्राफीचा आरोप लागला आहे.

मुंबई, 4 ऑगस्ट- मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या(Shilpa Shetty) पतीला अटक केली आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रावर (Raj Kundra Pornography Case) पोर्नोग्राफीचा आरोप लागला आहे. पतीला अटक होताचं शिल्पाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तिला सतत सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे. त्यामुळे अशा या कठीण काळात बॉलिवूडचे काही कलाकार शिल्पा शेट्टीला धीर देण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

नुकताच बॉलिवूड अभिनेता आर. माधवनने(R. Madhavan) शिल्पा शेट्टीला पाठींबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत युजर्सना आपल्या प्रायव्हसीचं भान राखण्याची विनंती केली होती. यावर अभिनेता आर. माधवनने कमेंट करत म्हटलं आहे, ‘तुम्ही खूप मजबूत आहात. तुम्ही या परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडाल. माझ्या ब्लेसिंग्स तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहेत’. असं म्हणत आर.माधवनने शिल्पाला पाठींबा दिला आहे. अलीकडेचं शिल्पाने ही पोस्ट शेयर करत चाहत्यांना आवाहन केलं होतं.

(हे वाचा: Shocking! हनी सिंगच्या पत्नीची कोर्टात धाव; घरगुती हिंसाचाराचे केले आरोप)

तसेच शिल्पा शेट्टीने मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. तिने याबद्दल आपल्या पोस्टमध्येसुद्धा सांगितलं आहे. तसेच आपण तपासामध्ये पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचंदेखील म्हटलं आहे.

(हे वाचा: Bigg Boss OTT: करीना आणि मलायकासोबत बिग बॉसच्या घरात राहायचंय: करण जोहर)

शिल्पा शेट्टीच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी कमेंट करत तिला पाठींबा दर्शविला आहे. शिल्पाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. काही तासांतचं जवळजवळ पाच लाखांच्यावर लाईक्स या पोस्टला मिळाले आहेत. कलाकारांसोबतचं शिल्पा शेट्टीचे अनेक चाहतेसुद्धा तिला पाठींबा देत आहेत.

First published:

Tags: Raj kundra, Shilpa shetty