स्टुडंटच्याच प्रेमात पडलेल्या 'या' अभिनेत्याची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

स्टुडंटच्याच प्रेमात पडलेल्या 'या' अभिनेत्याची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

हा प्रसिद्ध अभिनेता आज त्याच्या लग्नाचा 20वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जून : बॉलिवूड सुपरस्टार आर माधवन आज त्याच्या लग्नाचा 20वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी त्यानं त्याची पत्नी सरिताला विश करत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. माधवनने लिहिलं, 'तुझ्या प्रेमामुळे मला नेहमीच एका राजासारखं वाटतं आणि मी आज जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे. तुझ्यावर खूप प्रेम करतो. आज आपल्या लग्नाला 20 वर्ष झाली. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.' माधवनच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण तुम्हाला माहित आहे का माधवन आणि सरिताच्या लव्ह स्टोरीची सुरुवात कशी झाली. आज माधवनच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त जाणून घेऊयात माधवन-सरिताची लव्हस्टोरी...

 

View this post on Instagram

 

You make me feel like I am an emperor with just one smile and that twinkle in your eye, and a slave, with that unconditional love. I am cause you are that beautiful you . So so grateful and crazily in love with you ..My love .. ❤️❤️😘😘😘#married20yearsandcounting

A post shared by R. Madhavan (@actormaddy) on

माधवन आणि सरिताची लव्हस्टोरी इतरांसारखी अजिबात नाही ती थोडीशी हटके आणि खूप इंटरेस्टिंग आहे. माधवनचे वडील टाटा स्टीलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्यूटिव्ह होते तर आई सरोज बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होती. अभ्यासात हुशार असलेल्या माधवननं त्यासोबत अनेक छंदही जोपासले होते. त्याला आर्मीमध्ये प्रवेश घ्यायचा होता मात्र त्याच्या पालकांनी त्याला मॅनेजमेंट स्टीडी करण्याचं सुचवलं. इलेक्ट्रॉनिकची डिग्री घेतल्यानंतर माधवननं कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पिकिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली. याच क्लासमध्ये माधवन आणि सरिताची भेट झाली.

हे आहेत बॉलिवूडच्या 5 सुपरस्टारचे बॉडीगार्ड, त्यांचा पगार वाचून तुम्हीही व्हाल थक्क

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy) on

1991मध्ये सरिता एअरहोस्टेसच्या नोकरीची तयारी करत होती. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लाससाठी ती त्यावेळी महाराष्ट्रात आली होती. सरिताची माधवनच्या क्लासमध्ये निवड झाली. त्यानंतर तिनं त्याला पर्सनली भेटून माधवनचे आभार मानले आणि सोबतच तिनं त्याला डिनरसाठी बोलवलं. आपल्या पहिल्या डेटबद्दल माधवन सांगतो, 'सरिता माझी स्टूडंट होती आणि तिनं मला डिनर डेटसाठी विचारलं. माझ्यासाठी ही चांगली संधी होती. मी तिला त्याचवेळी प्रपोज केलं आणि नंतर तिच्याशी लग्न केलं.' माधवन आणि सरितानं जवळपास 8 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 1999मध्ये लग्न केलं. त्यांचं लग्न तमिळ पद्धतीनं झालं. या दोघांना आता वेदांत नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.

'या' प्रेग्नंट बॉलिवूड अभिनेत्रीचा अल्ट्रा साउंड व्हिडिओ होतोय व्हायरल

============================================================

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं कोल्हापूर विमानतळावर जंगी स्वागत

First published: June 6, 2019, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading