Home /News /entertainment /

सतीश कौशिक यांचा एयरलाईनवर गंभीर आरोप, समोर आलं विचित्र प्रकरण

सतीश कौशिक यांचा एयरलाईनवर गंभीर आरोप, समोर आलं विचित्र प्रकरण

बऱ्याचवेळा कलाकरांनासुद्धा काही कडवट अनुभव येत असतात. अनेकवेळा त्यांना गैरसोयींना सामोरं जावं लागतं असंच काहीसं एक ज्येष्ठ अभिनेता आणि निर्मात्यांसोबत घडलं आहे.

    मुंबई, 27 मे-   बऱ्याचवेळा कलाकरांनासुद्धा काही कडवट अनुभव येत असतात. अनेकवेळा त्यांना गैरसोयींना सामोरं जावं लागतं असंच काहीसं एक ज्येष्ठ अभिनेता आणि निर्मात्यांसोबत घडलं आहे. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक  (Satish Kaushik )  यांनी गो फर्स्ट   (Go First)  एअरलाइनवर  (Airlines)  चुकीच्या पद्धतीने पैसे कमावल्याचा आरोप केला आहे. सतीश यांनी फ्लाइटमधील एका सीटबद्दल आपल्याशी कशी चुकीची वागणूक दिली गेली हे सांगितलं आहे. अनेक ट्विट पोस्ट करत त्यांनी संपूर्ण घटना सांगितली आहे. सतीश कौशिक यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एअरलाइन्स फ्लाइट जर्नीशी संबंधित घटनेचे तपशीलवार वर्णन करणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, 'गो फर्स्ट एअरवेज हे खूप दुःखद आहे. त्यांनी प्रवाशांकडून पैसे कमावण्यासाठी चुकीचा मार्ग शोधला आहे. माझ्या ऑफिसमधून (सतीश कौशिक/अजय राय) पहिल्या लाईनमधल्या 2 सीट्स 25 हजार रुपयांना बुक केल्या होत्या . इतकंच नव्हे माझ्या ऑफिसने पैसे दिले असताना या लोकांनी ती सीट दुसऱ्या प्रवाशाला विकली. सतीश कौशिक यांनी दुसरा ट्विट करत पुढं लिहिलं, 'हे ठीक आहे का? प्रवाशाला त्रास देऊन अधिक पैसे कमवण्याचा हा मार्ग आहे का? पैसे परत मिळणे ही बाब नसून तुमचं ऐकणं ही बाब आहे. मी फ्लाइट थांबवू शकलो असतो पण मी तसे केले नाही कारण बाकीच्या प्रवाशांना बघून मला असं जाणवलं की, हे सर्व लोक आधीच 3 तास ​​वाट पाहात आहेत. गुडलक गो फर्स्ट एअरलाइन'. असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. सतीश यांनी आणखी एक ट्विट करत लिहिलं की, ''जेव्हा त्यांच्याकडे मदत मागितली गेली तेव्हा त्यांना सांगण्यात आले की प्रवासी पुढच्या फ्लाइटने जाईल पण प्रवासी त्याच फ्लाइटमधील होता. सतीश यांनी लिहिलं, 'जेव्हा त्या प्रवाशाला जागा मिळाली नाही. तेव्हा फ्लाइट थांबवण्यात आली. त्यानंतर मी त्याला जागा देण्याचे ठरवले. चांगली गोष्ट म्हणजे फ्लाइट अटेंडंट आणि एअर होस्टेसने यासाठी माझे आभार मानले. त्या सीटचे माझे पैसे परत मिळतील असेही त्यांनी सांगितले पण मी त्यांना सांगितले की असे कधीच होणार नाही. आणि परिणामी विमान कंपनीने रिफंड देण्यास नकार दिला'. सध्या सतीश कौशिक आपल्यासोबत घडलेल्या या गैरसोयीमुळे फारच नाराज आहेत. त्यांच्या या ट्विटवर अनेक युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Marathi entertainment

    पुढील बातम्या