मुंबई, 9 जून- अभिनेता(Actor) प्रतिक बब्बर (Pratik Babbar) आणि सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) ‘छिछोरे’ या चित्रपटात एकत्र काम केल आहे. गेल्यावर्षी सुशांतने गळफास घेत आत्महत्या केली होती. सुशांत एक असा अभिनेता होता ज्याने फार कमी वेळेत प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं होतं. सुशांतच्या पहिल्या स्मृतिदिना आधी अभिनेता आणि त्याचा सहकलाकार प्रतिक बब्बरने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
नुकताच प्रतिक बब्बरने Bombay Times ला मुलाखत दिली होती, त्यावेळी त्याने सुशांतबद्दल सुद्धा संवाद साधला होता, प्रतिकने म्हटलं आहे, ‘ सुशांत सिंह राजपूत एक मनमिळाऊ व्यक्ती होता. मात्र कधी कधी तो स्वतःच्याच जगात जात होता. सुशांतची एक वेगळीच शैली होती. ती बॉलिवूड कलाकारांमध्ये खुपचं विरळ आहे. मला आनंद होतो, की मी सुशांतसोबत काम केल आहे. एखाद्या इव्हेंट किंवा जिममध्ये माझी सतत सुशांतसोबत भेट होतं असे. ‘छिछोरे’ चित्रपटावेळी आम्ही दोघे सोबत सीनची तयारी करत असू, त्यामुळे आमच्यात एक चांगली मैत्री झाली होती.
(हे वाचा: रुपाली भोसलेचा Before & After लुक पाहून चाहते अवाक्; पाहा VIRAL PHOTO )
पुढे प्रतिकने म्हटलं की, सुशांत खुपचं उत्साहाने भेटत होता. त्याला विनोद करायला खूप आवडत होतं. मात्र हेसुद्धा सत्य आहे की कधीकधी तो सर्वांपासून अलिप्त राहात होता. त्याला चंद्र, तारे, फिजिक्स, ग्रह यांच्या बाबतीत बोलायला आवडत होतं. मला आजही आठवत त्याला अंटार्क्टिकेला जायचं होतं. त्याने म्हटलं होतं, की छिछोरे संपल्यानंतर तो तिकडे जाणार आहे. मी त्याचं बोलणं ऐकून थक्क झालो होतो. कारण असा विचार कोण करू शकतो? तो आयुष्याकडे एका नव्या दृष्टीकोनातून बघत होता’. असं प्रतिक बब्बरने म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant sing rajput