मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'केदारनाथ'च्या सेटवर ड्रग्स घेत होते सारा-सुशांत? नितीश भारद्वाज यांनी केला मोठा खुलासा

'केदारनाथ'च्या सेटवर ड्रग्स घेत होते सारा-सुशांत? नितीश भारद्वाज यांनी केला मोठा खुलासा

 रियाने NCB ला दिलेल्या जबाबात असं म्हटलं आहे, की ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्यावेळी अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि सुशांत सिंह राजपूत दोघेही ड्रग्सचं घेत होते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 8 जून- अभिनेता (Actor)  सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर (Sushant singh Rajput)  अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या. तसेच सुशांतवर ड्रग्स घेत असल्याचे आरोपसुद्धा करण्यात येत आहेत. रिया चक्रवर्तीने NCB ला जबाब दिल्यानंतरसुद्धा अनेक गोष्टी समोर येत आहेत. रियाने NCB ला दिलेल्या जबाबात असं म्हटलं आहे, की ‘केदारनाथ’ या चित्रपटावेळी अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि सुशांत सिंह राजपूत दोघेही ड्रग्स घेत होते. केदारनाथमध्ये साराच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वाज (Nitish Bhardwaj) यांनी याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

नुकताच नितीश भारद्वाज यांनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखात दिली आहे, यावेळी त्यांनी याचा खुलासा केला आहे, नितीश यांनी म्हटलं आहे, की ‘केदारनाथच्या सेटवर अभिनेत्री पूजा गौर आणि माझ मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या गोष्टींवर बोलणं सुरु होतं. आणि बोलता बोलता आमच्यामध्ये ड्रग्सच्या मुद्द्यावरसुद्धा बोलन झालं. तेव्हा सारा आम्हाला म्हणाली की, ‘मीसुद्धा चित्रपटसृष्टीतील ड्रग्सच्या प्रभावाबद्दल ऐकलं आहे. यावर मी साराला स्पष्ट शब्दांत सांगितल होतं, की तू अशा गोष्टींपासून नेहमी दूर राहा.

(हे वाचा:बापरे! त्या प्रसंगाने इरफानने सोडलं टीव्ही क्षेत्र, वाचा काय होता भयानक अनुभव   )

यावर मला साराने खूपच विश्वासाने सांगितलं होतं, की मी अशा कोणत्याही गोष्टींच्या आहारी कधीच जाणार नाही. आणि मी आजपर्यंत कधी ड्रग्स बघितलेही नाहीत’. तसेच सुशांतबद्दल बोलताना ते म्हणाले,  सुशांतबद्दल सांगायचं तर तो स्मोक करत होता. मात्र ते ड्रग्स नव्हते. मी जरी सिगारेट किंवा ड्रिंकपासून दूर असलो, तरी ड्रग्स सिगारेट आणि साधी सिगार यातील फरक मला समजतो. त्याचा वास देखील नॉर्मलच होता’. तसेच सेटवर सारा आणि सुशांत नेहमीच सक्रीय असायचे आणि नॉर्मलदेखील असायचे. ड्रग्स घेणारे लोक इतके नॉर्मल असूचं शकत नाही असं मला वाटत. असं मत नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Sara ali khan, Sushant sing rajput