अभिनेता-दिग्दर्शक नीरज बोरा यांचं निधन

प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे गुरुवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2017 12:17 PM IST

अभिनेता-दिग्दर्शक नीरज बोरा यांचं निधन

14 डिसेंबर: खिलाडी ४२०', 'फिर हेराफेरी', 'चोरी चोरी चुपके चुपके' या सिनेमांच्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, तर 'विरासत', 'रंगीला', 'मन' आणि 'ओम शांती' या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळीच छबी उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे गुरुवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होते आहे.

मीडियाशी बोलताना नीरज यांच्या कुटूंबाने सांगितले की, 'नीरज यांचं पार्थिव आधी फिरोज नाडीयाडवाला यांच्या घरी 'बरकत'ला नेण्यात येईल आणि नंतर दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईल.'

नीरज व्होरा हे मागच्या एका वर्षापासून आजारी होते. यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि ब्रेन स्ट्रोकही आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे ते कोमामध्ये गेले, त्यांना बराच काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. या कठीण काळात नीरज यांना त्यांच्या जवळचा मित्र फिरोज नाडियादवाला यांनी खूप मदत केली.

फिरोज यांनी त्यांना दिल्लीहून मुंबईला त्यांच्या घरी आणलं आणि नीरज यांची सगळी जबाबदारी स्विकारली.

Loading...

'फिर हेरा फेरी' या सिनेमात त्यांच्यासोबत काम करणाऱ्या परेश रावल यांनीही टि्वटरवरून नीरज यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे.

 

नीरज हे एक उत्तम अभिनेता, लेखक, दिग्दर्शक होते. त्यांनी त्यांच्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकली होती.पण त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2017 11:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...