मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'थोडी तरी लाज बाळगा' मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेणाऱ्या कलाकारांवर भडकला नवाझुद्दिन

'थोडी तरी लाज बाळगा' मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेणाऱ्या कलाकारांवर भडकला नवाझुद्दिन

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा (coronavirus) वाढल्याने लॉकडाऊनचा (lockdown) पर्याय अवलंबण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शुटींगसुद्धा बंद (shooting ban) ठेवण्यात आल्या आहेत. याच काळात बॉलीवूडमधील अनेक कलाकार (bollywood stars) सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीव (maldive vacation) आणि इतर ठिकाणी जात आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 24 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा (coronavirus) वाढल्याने लॉकडाऊनचा (lockdown) पर्याय अवलंबण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे सर्व शुटींगदेखील बंद (shooting ban) ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बॉलीवूडमधील अनेक कलाकार (bollywood stars) सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीव (maldive vacation) आणि इतर ठिकाणी जात आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटिज सोशल मीडियावर आपले व्हॅकेशनचे फोटोसुद्धा पोस्ट करत आहेत. बॉलीवूड अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीक्कीने (nawazuddin siddiqui) या कलाकारांवर निशाना साधत राग व्यक्त केला आहे.

देशात कोरोना महामारी वाढल्यानंतर या परिस्थितीत विदेशात सुट्टीचा आनंद घेणाऱ्या कलाकारांवर नवाझुद्दिन भडकला आहे.  ‘लोकांना जेवायला अन्न नाही, आणि तुम्ही सुट्टीवर पैसे उडवत आहात, थोडी तरी लाज बाळगा’, असं म्हणत त्याने 'स्पॉटबॉयसोबत’ बोलताना आपला राग व्यक्त केला आहे.

पुढे नवाझुद्दिनने म्हटलंय, ‘ते लोक काय बोलणार आहेत? त्यांनी तर मालदीवचा तमाशा करून सोडलाय. मला माहित नाही त्यांची टुरिझम इंडस्ट्रीसोबत काय अरेंजमेंटस आहेत, मात्र या लोकांनी निदान माणुसकी म्हणून आपल्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर न टाकता स्वतः पुरता मर्यादित ठेवावेत. देशात सर्व लोक अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोक खुपचं त्रस्त आहेत. अशामध्ये तुमच्या सुट्टीचे फोटो त्यांना दाखवून त्यांचा धीर खचू देऊ नका.'

(वाचा: कुंभमेळ्यातून परतल्यानंतर झाला होता कोरोना; श्रवण राठोड यांच्या मुलाचा खुलासा)

तसंच ‘आम्हा कलाकार लोकांना थोडा मोठेपणा दाखवायला हवा, कारण लोक आपल्याला फॉलो करतात. त्यामुळे आपल्याला थोडं जबाबदार व्हायला हवं, असंही तो म्हणाला. यादरम्यान जेव्हा नवाझुद्दिनला तुम्ही कधी मालदीवला जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत त्याने, अजिबात नाही मी सध्या ‘बुधाल’ला माझ्या गावी आहे आणि माझ्या कुटुंबांसोबत राहत आहे, असं त्याने सांगितलं.

(वाचा: अक्षय कुमार ते आलिया भट्ट! बॉलिवूड कलाकारांच्या vanity कोरोना योद्धांच्या सेवेत)

दरम्यान, नवाझुद्दिन लवकरच कुशन नंदी यांच्या ‘जोगीरा सारा रा रा’ या कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय आणि ‘क्रूक’ फेम अभिनेत्री नेहा शर्मादेखील स्क्रिन शेअर करणार आहे. सध्या नवाझुद्दिनच्या ‘बोल चुडिया’ या चित्रपटातील गाणंही रिलीज झालं असून यात तो एका वेगळ्याच अंदाजात दिसतो आहे.

First published:

Tags: Bollywood, Coronavirus, Maharashtra, Marathi entertainment