Home /News /entertainment /

बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

गेल्या वर्षीय या अभिनेत्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यातच या वर्षी त्याच्या आईचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.

  मुंबई, 8 जून : बॉलिवूड अभिनेता मुरली शर्मा याची आई पद्मा शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे रविवारी निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. त्यांनी मुंबईतील आपल्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षी मुरलीने त्यांचे वडील व्रजभूषण शर्मा गमावले होते. ते 84 वर्षांचे होते. मुरली शर्माने गोलमाल, सिंघम, मैं हूं ना अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. अलीकडेच तो वरुण धवन आणि श्रद्धा कपूरच्या स्ट्रीट डान्सर 3 डी मध्येही दिसला होता. मुरली आपल्या कामासाठी नेहमीच चर्चिला जातो. चित्रपटातील भूमिका कमी असली तरी अभिनयाच्या ताकदीवर त्याने वठवलेली प्रत्येक भूमिका चाहत्यांना भावते. आईच्या अचानक जाण्याने त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तेलगू चित्रपटांमध्येही केले काम  बॉलिवूड व्यतिरिक्त मुरलीने अथिडी, साहो, भाले भाले मगदीवोई, निन्नू कोरी, भागगामी, डीजे अशा अनेक तेलगू चित्रपटात काम केले आहे. अलीकडेच तो अला वैकुंठपुरमलो या तेलगू चित्रपटात दिसला होता. हे वाचा-पहले धंदा मर्द संभालते थे अब बचे नही; सुष्मिता सेनच्या वेबसीरिजचा ट्रेलर लॉन्च संपूर्ण देश झाला ‘अनलॉक’; मात्र या 2 राज्यांनी वाढवला लॉकडाऊन मोठा निर्णय! Covid काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं विमा संरक्षण

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या