युवीच्या निवृत्तीनंतर धोनीच्या मौनवर अभिनेत्याने उपस्थित केला प्रश्न, म्हणाला- 'दुश्मनी गेहरी है...'

युवीच्या निवृत्तीनंतर धोनीच्या मौनवर अभिनेत्याने उपस्थित केला प्रश्न, म्हणाला- 'दुश्मनी गेहरी है...'

यावेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जून- अभिनेता आणि निर्माता कमाल राशिद खान (केआरके) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहत असतो. सोशल मीडियावर आपल्याच नावाची चर्चा कशी करावी हे त्याला बरोबर कळलं आहे. यावेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला आहे. युवराज सिंगने १० जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. यावेळी क्रिडा जगताप्रमाणेच बॉलिवूड, राजकीय अशा सर्व क्षेत्रातून युवराजला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याचसंदर्भात आता केआरकेने एक वादग्रस्त ट्वीट केलं आहे.

हेही वाचा- बॉलिवूडच्या 'या' 5 सुपरस्टार बाबांनी आपल्या मुलांना दिले सर्वात महागडे गिफ्ट

कमाल आर खानने युवराजच्या  निवृत्तीवर ट्वीट करत म्हटलं की, 'युवराज सिंग त्याच्या निवृत्तीवेळी महेंद्रसिंग धोनीबद्दल काहीच बोलला नाही आणि धोनीही युवीच्या निवृत्तीबद्दल काही बोलला नाही. याचा हाच अर्थ होतो की, दोघांमधलं शत्रूत्व जुनं आहे.' याआधी केआरकेने सलमान खानच्या भारत सिनेमाबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सलमानच्या करिअरमधील सर्वात वाईट सिनेमा असं केआरकेने भारतबद्दल स्पष्ट म्हटलं होतं. एवढंच नाही तर सलमानकडून कतरिना राष्ट्रीय पुरस्कार देण्याच्या वक्तव्याची केआरकेने थट्टी उडवली होती.

हेही वाचा- ...म्हणून शोएब अख्तरला सोनाली बेंद्रेचं करायचं होतं अपहरण, स्वतःच सांगितलं कारण

केआरकेने ट्वीट करत म्हटलं होतं की, 'सलमान खान म्हणाला होता की, कतरिना कैफला भारत सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे आणि आम्हालाही त्याचं म्हणणं पटलं.' जर सलमान ज्युरी मेंबर असेल तर हे नक्कीच होईल आणि तेव्हा सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनी त्यांचे पुरस्कार परत दिले पाहिजे.

5 हजारांसाठी उसतोड कामगाराचं अपहरण CCTV व्हिडिओ समोर

First published: June 16, 2019, 10:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading