मुंबई, 8 डिसेंबर - तामिळनाडूत झालेल्या भीषण दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचं निधन झालं आहे. भारतीय वायूदलाने ट्विट करत याबबात माहिती दिली आहे. जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिया रावत यांच्यासह विमानात (IAF helicopter crash in Tamil Nadu) असलेल्या आणखी 11 जणांचं दुर्देवी निधन झालं आहे. या निधनामुळे देशाचं खूप मोठं नुकसान झालं आहे.बिपीन रावत यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केले आहे.
बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने ट्विटमध्ये लिहिले की, 'जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. सर, मातृभूमीच्या 4 दशकांच्या नि:स्वार्थ सेवेसाठी आम्ही तुम्हाला सलाम करतो. भारताच्या सर्वोत्तम सैनिकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याच्या शोकात मी माझ्या देशासोबत आहे. ओम शांती.'
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते कबीर बेदी यांनी ट्विट केले की, “जनरल रावत यांच्या निधनाने खूप दुःख झाले. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना दिल्लीत भेटलो होतो, जेव्हा पोलो मॅचनंतर त्यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं तेव्हा आम्ही एकत्र गेलो होतो. त्यांच्यामुळे मी खूप प्रभावित झालो. भारतीय लष्कराचे मोठे नुकसान. RIP.'
चित्रपट निर्माते रेसुल पुकुट्टी (Resul Pookutty) यांनी लिहिले आहे की, 'दुखद.... त्यांच्या आत्म्याला शांती लाभो... त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याला सलाम...’
दुःख व्यक्त करताना अभिनेत्री सोफी चौधरीनेही लिहिले, 'मनापासून शोक.'
प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे.
वाचा: IAF Helicopter Crash: तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचं निधन
कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. मात्र, कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे त्या परिसरात घनदाट जंगल आहे. या घटनास्थळावरचे फोटोज आणि व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment