मुंबई, 1 मे : कोरोनाची परिस्थिती (corona pandemic) ही राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरातच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत तर काही ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. याशिवाय औषधांची कमतरता तर आहेच. त्यामुळे अनेकांनी आता पुढे येत मदत करायला सुरुवात केली आहे. त्यात काही बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) ही आता मदतीला पुढे आला आहे.
जॉनेने आगळीवेगळी अशी मदत करायचं ठरवलं आहे. त्याने त्याचं सोशल मीडिया अकाउंट (social media account handed over to NGO) एका सेवाभावी संस्थेला देऊ केलं आहे. या मार्फत त्या संस्थेला रुग्णांची तसेच गरजूंची मदत करायची मदत करायची आहे. सध्या अनेकजन आपल्या अकाउंटवरुन विविध प्रकारची रुग्णांच्या गरजेची माहिती सोशल मीडियावर शेअर करतात. पण सेलिब्रिंटीची फॅनफॉलोइंग ही लाखोंच्या घरात असते त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचणं शक्य आहे.
ऋषी कपूर यांचा पहिला स्मृतिदिन; रणबीरसह आलियानं वाहिली श्रद्धांजली
पुढे जॉन ने म्हटलं आहे, “आजपासून माझं सोशल मीडिया हे सेवाभावी संस्थेला देत आहे. देशभरातील इतर अनेक संस्था एकत्र येऊन काम करत आहेत. माझ्या अकाउंटवरून केलेल्या पोस्ट या लोकांना लागणाऱ्या वस्तू त्यांना कुठे मिळतील ही माहिती पुरवण्यासाठी आहे.”
View this post on Instagram
“माणूसकी दाखवत संकटावर मात करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पुढे येण्याची हीच ती वेळ आहे. जीव वाचवण्यासाठी आणि ही लढाई जिंकण्यासाठी आपण एकत्र असणं गरजेच आहे. त्यासाठी घरीच राहा, सुरक्षित रहा. स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि देशासाठी जबाबदार रहा,” असं जॉन ने लिहीलं.
View this post on Instagram
यानंतर जॉन ने आणखी एक पोस्ट शेअर केली ज्यात वृद्धांसाठी माहिती दिली होती. अनेक वृद्ध व्यक्ती या एकटेपणाच्या शिकार असतात. तेव्हा त्यांच्या मनावर याचा परिणाम होऊ नये यासाठी काही काउंसेलिंगचे नंबर देण्यात आले आहेत. ज्यावर मोफत काउंसेलिंग मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Coronavirus, John abraham