मुंबई, 08 जून- एकीकडे सिनेमांचं चित्रीकरण करताना तो वेबसीरिजमध्येही काम करत आहे. डिजीटल माध्यमांचं महत्त्व त्याने ओळखलं असलं तरी त्याची मातीची नाळ अजून तुटली नाही. आम्ही बोलतोय ते बॉलिवूडचा स्टार जॅकी श्रॉफबद्दल. नुकताच जॅकीचा भारत सिनेमा प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ४० कोटींहून अधिक गल्ला कमावला. लवकरच जॅकी प्रभासच्या साहो सिनेमातही दिसणार आहे.
जॅकी स्वतःच्या दिनक्रमाबद्दल बोलताना म्हणाला की, जर तो चित्रीकरणामध्ये व्यग्र नसेल तर तो शेती करण्याला प्राधान्य देतो. बदलत्या हवामानाचा संपूर्ण जगालाच फटका बसत आहे, अशावेळी पर्यावरणाची काळजी घेणं आपल्याच हातात आहे. जॅकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याने काही फोटो शेअर केले आहेत. तो गेल्या काही दिवसांपासून झाडांशी संबंधित पुस्तक वाचत आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक त्याला अभिनेत्री डिंपल कपाडियाने भेट दिलं आहे. याशिवाय त्याचा सर्वात जवळचा मित्र डॅनी त्याला संत्र्याच्या बिया आणि केळ्याची रोपं थेट सिक्कीमहून पाठवतो.
VIDEO- 'या' अभिनेत्रीच्या घरात घुसलं माकड, बेडरूममध्ये घातला हैदोस
कॅलिफोर्निया कॉन्सर्टमधील अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?
जॅकीने आधीच सांगितलं की, टायगरच्या काही सिनेमांशिवाय तो फारसे सिनेमे पाहत नाही. याऐवजी तो जपानची शेती आणि त्यांचं तंत्रज्ञान याच्याशी निगडीत लघुपट पाहणं पसंत करतो. शेती केल्याने त्याला एक आत्मिक समाधान मिळतं. हे माझं आयुष्य आहे. झाडं, रोपं यांच्यासोबत राहणं मला आवडतं, असं तो सांगतो.
VIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी