Home /News /entertainment /

नवऱ्यापासून वेगळं होण्याच्या दु:खातून नाही सावरली आहे 'या' अभिनेत्याची पत्नी, म्हणाली...

नवऱ्यापासून वेगळं होण्याच्या दु:खातून नाही सावरली आहे 'या' अभिनेत्याची पत्नी, म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता इम्रान खान (Imran Khan) आणि त्याची पत्नी अवंतिका (Avantika) यांच्या नात्यात अडचणी निर्माण झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

    मुंबई, 26 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता इम्रान खान (Imran Khan) आणि त्याची पत्नी अवंतिका (Avantika) यांच्या नात्यात अडचणी निर्माण झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या दरम्यान आता अवंतिकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक मेसेज शेअर केला आहे, ज्यामुळे त्यांचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अद्याप इमरान किंवा अवंतिका या दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलेपणाने कोणतेच भाष्य केले नाही आहे. पण अवंतिकाने केलेल्या पोस्टमुळे त्यांच्या नात्यातील कुरबूर सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अवंतिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट स्टोरीमध्ये शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की "मी बरी होत आहे, धुम्रपान आणि मद्यपान यामध्ये आयुष्य घालवण्यापेक्षा, झोपण्यात किंवा अस्वस्थ होण्याऐवजी, परिस्थिती पासून पळून जाण्याऐवजी मी त्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहे.' या पोस्टमुळे अवंतिका अधिक चर्चेत आली आहे. याआधी अवंतिकाने विवाह आणि घटस्फोट अशी संबंधित एक पोस्ट केली होती, तेव्हाही त्यांचं नातं दुरावल्याची चर्चा झाली होती. त्या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं की लग्न करणं कठीण आहे, घटस्फोट घेणं देखील कठीण आहे, जाडेपण कठीण आहे, फिट राहणं सुद्धा कठीण आहे, कर्जात राहणं देखील अवघड आहे, आर्थिक शिस्त पाळणं देखील अवघड आहे, संवाद साधणं देखील अवघड आहे कारण आयुष्य कधीच सोपं नसतं, ते नेहमी कठीणच असतं. परंतु आपण कोणते कठीण जीवन निवडायचे ते आपण ठरवू शकतो.' (हे वाचा-अंकिताचा बॉयफ्रेंडबरोबर रोमँटिक डान्स, VIDEO पाहून सुशांतच्या चाहत्यांची टीका) गेल्यावर्षी जून 2019 मध्ये मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले होते की अवंतिका महिन्याभरापूर्वी इमरान खानचे घर सोडून आपल्या आईच्या घरी गेली होती. तेव्हापासून अवंतिका पतीपासून वेगळी राहत आहे. एप्रिल 2019 मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांच्यातील संबंधांमधील मतभेद लोकांसमोर आणले होते. या दोघांनाही मुलगी असून ती अवंतिका सोबत रहात आहे. इमरान खानने 2011 मध्ये गर्लफ्रेंड अवंतिकाशी लग्न केलं होतं आणि त्यानंतर त्यांचा संसार सुरू झाला. परंतु आता त्यांच्या संसारात काही मतभेद सुरू झालेले आहेत. परंतु त्या दोघांनी अजूनही या बाबतीत कुठेच खुलेपणाने काहीच उघड केलेले नाही. परंतु अवंतिकाने केलेल्या पोस्टमुळे आता त्यांचं नाते अधिकच चर्चेत येत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Imran khan

    पुढील बातम्या