मुंबई, 07 जून- आमिर खानचा भाचा इम्रान खान सध्या चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात इम्रानची बायको अवंतिका मलिक त्याचं घर सोडून माहेरी राहायला आली. अवंतिका तिच्यासोबत मुलीलाही घेऊन माहेरी गेली. दरम्यान, इम्रान नुकताच जिममधून वर्कआउट करून बाहेर येताना दिसला. यावेळी त्याने टी-शर्ट, ग्रे शॉर्ट्स, निळ्या रंगाची टोपी आणि स्पोर्ट्स शूज घातले होते.
इम्रानचा हा फोटो पाहून अनेकांना अजूनही आश्चर्याचा धक्का बसतोय. यात इम्रान फार बारीक दिसतोय. विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला. इम्रानचं बॉलिवूडमधलं करिअर अयशस्वीच राहिलं. गेल्या चार वर्षात त्याचा एकही सिनेमा आला नाही. आता इम्रानच्या पत्नीने अवंतिकाने त्याचं घरही सोडलं. असं म्हटलं जातं की, दोघांच्या नात्यात दुरावा आल्यामुळे अवंतिकाने मुलीला घेऊन माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.
सिनेमात राष्ट्रगीतावेळी हॉलमध्ये उभे राहिल्याबद्दल सलमानने मानले आभार, म्हणाला ‘जय हिंद’
अडीच वर्षांच्या मुलीच्या बलात्कारावर चिडलं बॉलिवूड, आरोपीला फाशीच्या शिक्षेची केली मागणी
मीडिया रिपोर्टनुसार, अवंतिकाच्या आईनेही हे मान्य केलं की अवंतिका आणि इम्रानमध्ये वाद झाले. मात्र दोघं वेगळं होण्याचा निर्णय घेत नसल्याचंही त्या म्हणाल्या. दोघांमध्ये मतभेद असून ते लवकरच सुटतील असंही त्या म्हणाल्या. आता इम्रानचं घर सोडल्यानंतर अवंतिकाने खान आडनावही काढून टाकलं आहे. आता अवंतिका फक्त मलिक हेच आडनाव लावते. दोघांमध्ये अनेक कारणांवरून वाद सुरू होते. मतभेद एवढे वाढले की तिने इम्रानचं पाली हिलमधलं घर सोडण्याचा निर्णय घेतला. आता दोघांच्याही घरातले त्यांच्यातला वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
घटस्फोटाच्या एक वर्षानंतरच ज्वाला गुट्टाला डेट करतोय हा अभिनेता
रणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग?