पत्नी अवंतिकाशी घटस्फोटाबद्दल इम्रानला विचारला प्रश्न, ही दिली पहिली प्रतिक्रिया

पत्नी अवंतिकाशी घटस्फोटाबद्दल इम्रानला विचारला प्रश्न, ही दिली पहिली प्रतिक्रिया

इम्रान आणि अवंतिका यांच्यामधले मतभेद मिटवण्याचा दोन्ही कुटुंब प्रयत्न करत आहेत. पण या सगळ्यात अवंतिकाने तिच्या नावातून इम्रान खानचं आडनाव काढून टाकलं आहे.

  • Share this:

मुंबई, 08 जून- आमिर खानचा भाचा अभिनेता इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या बी- टाऊनमध्ये जोर धरत आहेत. दोघांच्या नात्यात दुरावा आला असून अवंतिका इम्रानचं राहतं घर सोडून माहेरी गेली आहे. आता एका कार्यक्रमात इम्रानला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले असता त्याने आपली प्रतिक्रिया दिली.

घटस्फोटाशी निगडीत जेव्हा इम्रानला प्रश्न विचारण्यात आले तेव्हा इम्रानने छायाचित्रकारांकडे आणि व्हिडिओ जर्नलिस्टकडे पाहून फक्त हसला आणि त्यांना म्हणाला, ‘तुम्ही या कार्यक्रमात अशा प्रकारचे प्रश्न कसे काय विचारू शकता?’ दरम्यान या संपूर्ण संभाषणावेळी त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य कायम होतं.

कॅलिफोर्निया कॉन्सर्टमधील अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

View this post on Instagram

Happy birthday, baby! Thank you for all the wonderful things you've brought into my life. Love you.

A post shared by Imran Khan (@imrankhan) on

या अभिनेत्याच्या लग्नाच्याच दिवशी झालं होतं वडिलांचं निधन, आता होतेय घटस्फोटाची चर्चा

इम्रान आणि अवंतिका यांच्यामधले मतभेद मिटवण्याचा दोन्ही कुटुंब प्रयत्न करत आहेत. पण या सगळ्यात अवंतिकाने तिच्या नावातून इम्रान खानचं आडनाव काढून टाकलं आहे. यानंतरच दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, अवंतिकाच्या आईने दोघं घटस्फोट घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. इतरांप्रमाणेच त्यांच्यातही भांडण झालं असून ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. इम्रान आणि अवंतिकाने आठ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०११ मध्ये लग्न केलं. इम्रानच्या लग्नात आमिर खान आणि किरण रावसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दोघांना एक मुलगी असून २०१४ मध्ये तिचा जन्म झाला होता.

करण ओबेरॉय रेप केसमध्ये आता आली काळी जादू, प्रकरणाला नवं वळण

VIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी

First published: June 8, 2019, 1:52 PM IST

ताज्या बातम्या