याबद्दल बोलताना इम्राननं म्हटलं आहे. "मला किसिंग सीन किंवा बोल्ड सीन द्यायला काहीच अडचण नाही. मात्र एकच गोष्ट आपण किती वेळा करणार. म्हणजे त्याच-त्याच भूमिका किती वेळा साकारणार. मला काहीतरी वेगळं हवं आहे. जे मी याआधी कधीही केलेलं नाही. मला काहीतरी नवीन वाटणाऱ्या भूमिका हव्या आहेत. आणि मला ज्या भूमिका वेगळ्या वाटतात त्या मी स्वीकारत आहे"View this post on Instagram
याआधी मी बोल्ड भूमिका करत होतो. त्या लोकांना पसंत पडत होत्या. त्यातही मी काहीतरी नाविन्य शोधत होतो आणि ते साकारत होतो. मला हव्या असणाऱ्या भूमिका आता निर्माते मला देऊ करत आहेत. आणि मला आवडणाऱ्या भूमिका मी स्वीकारत आहे. हे वाचा - प्रियांकाला करायचं नव्हतं निकसोबत लग्न; कारण वाचून बसेल धक्का इम्रान मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांच्याशी इम्रानचं मामा-भाच्याचं नातं आहे. इम्रान हाश्मीनं 2003मध्ये, ‘फुटपाथ’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर इम्राननं अनेक मोठ्या चित्रपटात काम केलं आहे. इम्रान हाश्मीनं मर्डर, जन्नत, शांघाई, जन्नत 2, मर्डर 2, वन्स अपॉन टाईम इन मुंबई, द ट्रेन अशा विविध चित्रपटांत काम केलं आहे. हे वाचा - मि. परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खानला हवेत इंटर्न्स; काम काय, किती पगार पाहा सध्या इम्रान ‘चेहरे’ या बहुचर्चित चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. तसंच यामध्ये रिया चक्रवर्ती, क्रिस्टल डिसुझा, अनु कपूर हे सुद्धा महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.नुकताच या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment