मुंबई, 17 जून- बॉलिवूड
(Bollywood) अभिनेता हृतिक रोशनने
(Hrithik Roshan) आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. हृतिक रोशनची आजी पद्मा राणी ओमप्रकाश
(Padma Rani Omprakash Passed Away) यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पद्मा राणी यांचं 16 जून रोजी पहाटे 3 वाजता निधन झालं आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत सकाळी 10.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं आहे.
पद्मा राणी या हृतिकच्या आईच्या आई होत्या. तसेच पद्मा राणी दिवंगत दिग्दर्शक-निर्माता जे ओम प्रकाश यांच्या पत्नी होत्या. हृतिक रोशनचे आजोबा आणि दिग्गज चित्रपट निर्माते जे ओम प्रकाश यांचे 7 ऑगस्ट 2019 रोजी निधन झालं होतं. ते 93 वर्षांचे होते. आणि मुंबईत राहात होते. त्यांच्या निधनाच्या तीन वर्षानंतर आता हृतिकच्या आजीचं निधन झालं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पद्मा राणी यांना वयाच्या नव्वदाव्या वर्षी अनेक आरोग्यबाबत समस्या होत्या. पद्मा या गेल्या दोन वर्षांपासून रोशन कुटुंबासोबतच राहात होत्या. पद्मा यांची मुलगी आणि हृतिक रोशनच्या आई पिंकी रोशन वेळोवेळी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असत. त्या अनेकदा बेडवर त्यांच्याजवळ दिसून येत असत.
(हे वाचा:काश्मीरी पंडितांबाबतचं 'ते' वक्तव्य साई पल्लवीला भोवलं;अभिनेत्रीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल )
पद्मा राणी जे ओमप्रकाश यांच्या पत्नी होत्या, ओमप्रकाश यांनी ‘भगवान दादा’, ‘आप के साथ’, ‘आखिर क्यों?’, ‘अर्पण’, ‘आस पास’, ‘आशा’, ‘आशिक हूं बहारों का’, ‘अपनापन’, ‘आक्रमण’ आणि ‘आप की कसम’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यासोबतच त्यांनी ‘आंखें’, ‘आया सावन झूम के’, ‘आए दिन बहार के’, ‘आई मिलन की बेला’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.