• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • हृतिक रोशनने वाढदिवसादिवशीच उडवली कुणाल कपूरची खिल्ली; शॉर्ट्सवर दिली अशी कमेंट्

हृतिक रोशनने वाढदिवसादिवशीच उडवली कुणाल कपूरची खिल्ली; शॉर्ट्सवर दिली अशी कमेंट्

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कुणाल कपूरने(Kunal Kapoor Birthday) 18 ऑक्टोबर रोजी आपला 44 वा वाढदिवस साजरा केला.

 • Share this:
  मुंबई, 19ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कुणाल कपूरने(Kunal Kapoor Birthday) 18 ऑक्टोबर रोजी आपला 44 वा वाढदिवस साजरा केला. कुणाल कपूरने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) कुणाल कपूरचा बालपणीचा मित्र आहे. अशा परिस्थितीत, हृतिक रोशनने सोशल मीडियावर कुणाल कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसत्या तरच नवल. हृतिकने कुणालला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण अगदी हटके अंदाजात. वास्तविक पाहायला गेलं तर, हृतिक रोशनने स्वतःचा आणि कुणालचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये, कुणाल कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छादेत त्याने त्याला शॉर्ट्सबद्दल डिवचलं आहे. हृतिकने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा. हसत रहा, झटके देत रहा आणि कृपया ही शॉर्ट्स आता फेकून दे '. या फोटोमध्ये कुणाल कपूर काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पोल्का डॉट्स शॉर्ट्समध्ये दिसून येत आहे. त्याचवेळी तिच्यासोबत उभा असलेल्या हृतिकने डेनिम शॉर्ट्स आणि ब्लॅक हूडी घातला आहे. (हे वाचा:जैकलीन की हमशक्ल भी हैं एक एक्ट्रेस, PHOTOS देख कहीं आप भी न खा जाएं धोखा!) मात्र ही पहिलीच वेळ नाही जेव्हा हृतिक रोशनने कुणाल कपूरची खिल्ली उडवली आहे. गेल्या वर्षीही, त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने कुणाल कपूरला अशाच मजेशीर शुभेच्छा दिल्या होत्या. त्याने एक जुना फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करत त्याने लिहिलं होतं, 'हॅपी बर्थडे मॅन. मला आनंद आहे की आपण दोघे या दोघांसारखे दिसत नाही. 'तिने तिचा आणि कुणालचा एक किशोरवयीन काळातील फोटो शेअर केला होता. यामध्ये दोघेही फारच वेगळे दिसून येत होते. (हे वाचा:लग्नाआधीच आई होणार Slumdog Millionaire ची नायिका; फोटोग्राफरसोबत जमले बंध) वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, कुणाल अलीकडेच 'द एम्पायर' या वेब सीरिजमध्ये दिसला होता.यामध्ये त्याने मुघल शासक बाबरची भूमिका साकारली होती. शबाना आझमी,डिनो मोरिया आणि द्रष्टी धामी या वेबसिरीजमध्ये त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिले होते. कुणाल कपूरच्या या वेब सीरिजमधील अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते. याशिवाय तो नेटफ्लिक्सच्या 'अनटोल्ड स्टोरीज'मध्येही दिसला आहे. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त कुणाल कपूर तेलुगू आणि मल्याळम चित्रपट देखील करत आहे. पटकथा पाहिल्यानंतर त्याला बऱ्याचदा चांगले पात्र साकारायला आवडते.
  Published by:Aiman Desai
  First published: