मुंबई 1 मे : कोरोना व्हायरसचा (Corona virus) प्रकोप आता संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहे. तर परिस्थिती (pandemic) दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामेल अनेकजन आता मदतीला पुढे येत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही (Bollywood celebrity helps in covid) यात समावेश आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगन (Ajay Devgn), सलमान खान (Salman Khan), प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) यांनी मदतीचा हात पुढे केला होता. तर आता ‘सनम तेरी कसम फेम’ (Sanam Teri Kasam) अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshavardhan Rane) याने ही आता मदत करण्याचं ठरवलं आहे.
हर्षवर्धन राणे ने त्याच्या इन्स्टाग्राम (Harshvardhan posted on Instagram) वर त्याचा एक फोटो पोस्ट शेअर केला आहे.
यासोबत त्याने एक पोस्ट देखिल लिहिली आहे. या फोटोत हर्षवर्धन त्याची बाइक साफ करताना दिसत आहे. पोस्ट मध्ये त्याने लिहिलं आहे, ‘ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मिळवण्यासाठी मी माझी गाडी विकत आहे. यातून मी गरजवंताना ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन मिळूवून देणार आहे.’
View this post on Instagram
पुढे त्याने लिहिलं आहे, ‘हैद्राबाद मध्ये कुठे सगळ्यात चांगले ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मिळतील याची माहिती मला द्या’. असही त्याने म्हटलं. हर्षवर्धनचा हा निर्णय सगळ्यांनाच भावला आहे. तर अनेकांनी त्याच्या या पोस्ट नंतर त्याचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनला प्रसिद्धी मिळाली होती. 2016 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनेक तेलुगू चित्रपटांतही तो दिसला आहे. यानंतर हर्षवर्धन ‘हसिन दिलरुबा’ आणि ‘कून फाया कून’ या बॉलिवूड चित्रपटांत तो दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment