मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

वाँटेड, दबंग, राधे चित्रपटांतील या कलाकाराला मिळेना काम; मुलीच्या शाळेची फी भरायलाही पैसे नाहीत

वाँटेड, दबंग, राधे चित्रपटांतील या कलाकाराला मिळेना काम; मुलीच्या शाळेची फी भरायलाही पैसे नाहीत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जावेद हैदरकडे (Javed Haider) काम नसल्यामुळे बिकट परिस्थितीतून (Javed Haider financial crisis) जात आहे. फी भरली नाही म्हणून त्याच्या मुलीला ऑनलाइन शाळासुद्धा बंद करावी लागत आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जावेद हैदरकडे (Javed Haider) काम नसल्यामुळे बिकट परिस्थितीतून (Javed Haider financial crisis) जात आहे. फी भरली नाही म्हणून त्याच्या मुलीला ऑनलाइन शाळासुद्धा बंद करावी लागत आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जावेद हैदरकडे (Javed Haider) काम नसल्यामुळे बिकट परिस्थितीतून (Javed Haider financial crisis) जात आहे. फी भरली नाही म्हणून त्याच्या मुलीला ऑनलाइन शाळासुद्धा बंद करावी लागत आहे.

 मुंबई, 28 जुलै: कोरोना महामारीमुळे कित्येक लोकांनी आपले रोजगार गमावले आहेत. यात मग छोटी-मोठी कामं करणारे स्थलांतरीत मजूर, मल्टीनॅशनल कंपन्यांमधील कर्मचारी, लहान व्यावसायिक आणि अगदी बॉलिवूडमधील कलाकारांचाही (Corona effect on Bollywood) समावेश आहे. लॉकडाउनमुळे सध्या कित्येक सिनेमांचं आणि मालिकांचं शूटिंग थांबलं आहे. याचा फटका सेटवरील कामगारांसोबतच कलाकारांनाही बसत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जावेद हैदरही (Javed Haider) काम नसल्यामुळे बिकट परिस्थितीतून (Javed Haider financial crisis) जात आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या परिस्थितीबद्दल सांगितले. वन इंडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

जावेद हैदरने बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली होती. यानंतर पुढे वाँटेड, राधे, दबंग (Javed Haider films) अशा कित्येक चित्रपटांमध्ये त्याने काम केले. विशेष म्हणजे, या सर्व बिग बजेट चित्रपटांद्वारे ओळख निर्माण करुनही, जावेदला सध्या कोणतेही काम मिळत नाहीये. काम नसल्यामुळे तो सध्या आर्थिक संकटातून जात आहे. आपल्या मुलीच्या शाळेची फी (Javed Haider daughter school fees) भरणेही त्याला शक्य होत नसल्याचे त्याने आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

राज कुंद्रा नव्या अ‍ॅपसाठी करणार होता ‘या’ मराठी अभिनेत्रीची निवड

जावेदने म्हणाला, “काम नसल्यामुळे घरात पैसे येत नाहीयेत. तसेच, गेल्या काही महिन्यांमध्ये आतापर्यंतची सगळी सेव्हिंगही संपली आहेत. कोरोनामुळे मुलीच्या शाळेने काही प्रमाणात फी माफ केली आहे. मात्र, तरीही महिन्याला 2,500 रुपये भरावे लागत होते. सलग तीन महिने हे पैसे भरता आले नाहीत, म्हणून शाळेने माझ्या मुलीला ऑनलाईन क्लासमधुन काढून टाकले आहे.” यानंतर कुठूनतरी पैसे मिळवून त्यांनी आपल्या मुलीच्या शाळेची फी भरली. यानंतर आता त्यांच्या मुलीचे ऑनलाईन क्लासेस पुन्हा सुरू झाले आहेत.

दिलीप कुमारांमुळे मनोज कुमार यांनी बदललं आपलं खरं नाव; काय होता तो किस्सा?

जावेदने बॉलिवूडमधील कित्येक मोठ्या स्टार्ससोबत (Javed Haider and Salman Khan) काम केले आहे. या स्टार्सकडे मदत मागण्याची हिंमत आपल्यात होत नसल्याचे जावेदने या मुलाखतीमध्ये सांगितले. “कित्येक लोक मला म्हणाले, की तुझ्या ओळखीच्या स्टार्सना मदत माग. मात्र, मला या गोष्टीची भीती वाटते, की त्यांनी जर माझ्याकडे दुर्लक्ष केलं, किंवा टाळाटाळ केली तर आमचे संबंध बिघडतील. तसेच, बॉलिवूडमधील इतर लोकांकडेही मदत मागण्याचे मी टाळतो आहे. समजा कधी मी एखाद्या कामाच्या निमित्ताने कोणाला फोन केला, आणि त्यांनी मी पैशांसाठी फोन करतोय असं समजून तो इग्नोर केला तर? यामुळेच मी सध्या बॉलिवूड किंवा फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नसलेल्या मित्रांकडून मदत घेतो आहे.” असं जावेदने स्पष्ट केले.

आर्थिक संकटामुळे घर गहाण ठेवले आहे, तसेच बायकोचे दागिनेही गहाण ठेवावे लागले असल्याचे जावेदने या मुलाखतीत सांगितले. यामुळे लाईमलाईटमध्ये राहणाऱ्या बॉलिवूड कलाकारांनाही कोरोनामुळे मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor