Home /News /entertainment /

'आमिर मला चांगला अभिनेता समजत नाही'; भाऊ फैजलने व्यक्त केली खंत

'आमिर मला चांगला अभिनेता समजत नाही'; भाऊ फैजलने व्यक्त केली खंत

फैजल आणि आमिर 'मेला' चित्रपटात एकत्र झळकले होते.

मुंबई, 7 सप्टेंबर-  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला लोकप्रिय अभिनेता आमीर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आमीर खानने पत्नी किरण राव (Kiran Rao) हिच्यापासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यावर आमीरचा भाऊ बॉलिवूड अभिनेता फैजल खान (Faissal Khan) यानेही प्रतिक्रिया दिली होती. फैजल खान तसा प्रसिद्धीच्या झोतात नसतो; पण सध्या तो त्याच्या 'फॅक्टरी' या आगामी चित्रपटामुळे (factory movie) चर्चेत आहे. 'फॅक्टरी'च्या माध्यमातून तो दिग्दर्शक (director) म्हणून पदार्पण करणार आहे. दरम्यान, फैजल खानने त्याचा भाऊ आणि अभिनेता आमीर खानबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. आमीर खानला आपल्या अभिनयाबद्दल काय वाटतं, हे त्याने सांगितलं आहे. फैजल खान म्हणाला, की आमीर त्याला चांगला अभिनेता मानत नाही. (हे वाचा:अभिनेत्री ईशा गुप्ताचा सुपरहॉट LOOK; टॅटूने वेधलं सर्वांचं लक्ष ) एका मुलाखतीत फैजलला विचारलं गेलं, की 'मेला' चित्रपटानंतर आमीर खानने त्याला काम मिळवून देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही का. त्यावर फैजलने सांगितलं, ‘या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आमीरच योग्य व्यक्ती असेल. आमीरने कधीही मला मदत केली नाही. आज मला 'फॅक्टरी' चित्रपटामुळे माझी क्षमता लक्षात आली. कोणी तुम्हाला कशी मदत करेल, की ज्यांना वाटतं, मी एक चांगला अभिनेता नाही. मी चांगलं परफॉर्म करू शकत नाही.’ फैजल म्हणाला, 'आमीर खानने मेला चित्रपटानंतर मला फोन केला आणि तो म्हणाला, की 'फैजल तू एक चांगला अभिनेता नाहीस. आता 'मेला'पण फ्लॉप झाला. आता काय करायचं? तू काही तरी दुसरं शोध.’ (हे वाचा: DDLJ मध्ये शाहरुखने घातलेलं ते जॅकेट होतं 'या' अभिनेत्याचं) फैजल पुढे म्हणाला, 'मला या सगळ्याचा मोठा परिणाम सहन करावा लागला आहे. हे माझ्या आणि आमीरमधलं वैयक्तिक संभाषण होतं. चित्रपट फ्लॉप का झाला, याबद्दल मी कधीच बोललो नाही. त्याने त्याला काय वाटतं, ते मला सांगितलं. त्याने मला सांगितलं, की तू चांगला अभिनेता नाहीस. त्यामुळे तू दुसरं काही तरी करायला सुरुवात करणं केव्हाही चांगलं राहील. तू काय करू शकतोस, याचा तुला विचार केला पाहिजे, असं त्याने मला सांगितलं.’ ‘मेला’ चित्रपटानंतर आमीरने कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचा खुलासा फैजल खान याने केल्यानंतर अनेक जण अवाक झाले आहेत.
First published:

Tags: Aamir khan, Bollywood News

पुढील बातम्या