मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मधुबालाच्या प्रेमात होते दिलीप कुमार, मात्र या करणामुळे तुटलं नात

मधुबालाच्या प्रेमात होते दिलीप कुमार, मात्र या करणामुळे तुटलं नात

ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला अभिनेता दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. आणि दिलीप कुमारसुद्धा त्यांच्यावर प्रेम करत होते

ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला अभिनेता दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. आणि दिलीप कुमारसुद्धा त्यांच्यावर प्रेम करत होते

ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला अभिनेता दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. आणि दिलीप कुमारसुद्धा त्यांच्यावर प्रेम करत होते

    मुंबई, 6 जून-   चित्रपटांप्रमाणेच(Film) अनेक कलाकारांचे खरे आयुष्यही तितकेच फिल्मी आहे. त्याचंप्रमाणे अनेक कलाकारांच्या लव्हस्टोरीसुद्धा तितक्याचं फेमस आहेत. कित्येक अभिनेत्यांना आपलं प्रेम मिळालं. तर कित्येकांचं ते फक्त स्वप्नचं राहिलं. जेव्हा जेव्हा कलाकारांच्या लव्हस्टोरीचा(Lovestory)  विषय होतो. त्यामध्ये एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जातं. ते नाव म्हणजे अभिनेता दिलीप कुमार(Dilip Kumar) आणि अभिनेत्री मधुबाला (Madhubala) या जोडीचं ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला अभिनेता दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. आणि दिलीप कुमारसुद्धा त्यांच्यावर प्रेम करत होते. मात्र त्यांच्यामध्ये असं काही झालं की त्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. मीडिया रिपोर्टनुसार मधुबाला यांच्या वडिलांना दिलीप कुमार पसंत नव्हते. आणि त्यांना वाटत होतं की या दोघांचं लग्न होवू नये. ज्यावेळी दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. तेव्हा बी.आर. चोप्रा यांच्या ‘नया दौर’ या चित्रपटाचं शुटींग चालू होतं. शुटींगचा मोठा टप्पा पूर्ण झाला होता. मात्र काही दृश्यांचं शुटींग भोपाळमध्ये होणार होतं. मात्र मधुबाला यांच्या वडिलांनी त्यांना भोपाळला पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे शुटींग मध्येच रखडल. आणि त्यामुळे बी.आर.चोप्रा यांना मोठ नुकसान सहन करावं लागलं. (हे वाचा:बलात्कार प्रकरणात निया शर्माने दिला पर्ल व्ही. पुरीला पाठींबा  ) त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेलं. आणि तिथे दिलीप कुमार यांना कोर्टात साक्ष द्यायची होती. दिलीप कुमार यांनी सत्याची बाजू निवडली. आणि बी.आर. चोप्रा यांच्या बाजूने साक्ष दिली. त्यामुळे असं म्हटलं जातं. की या साक्षीने दोघांच्या नात्याला ग्रहण लागलं. आणि त्यांच्यामध्ये अंतर आलं. दोघांचं नात्याला पूर्णविराम मिळाला. नंतर दिलीप कुमार यांनी अभिनेत्री सायरा बानो सोबत लग्न केलं. आणि असं म्हटलं जातं, की याच रागात मधुबाला यांनी लेजेंडरी सिंगर किशोर कुमारसोबत लग्न केल.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment

    पुढील बातम्या