Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दिलीप कुमारांनी केलं होतं दुसरं लग्न; मग का परतले पहिली पत्नी सायरा बानोकडे?

दिलीप कुमारांनी केलं होतं दुसरं लग्न; मग का परतले पहिली पत्नी सायरा बानोकडे?

 केवळ 22 वर्षांची असताना सायरा बानोने 1966 मध्ये 44 वर्षांच्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं.

केवळ 22 वर्षांची असताना सायरा बानोने 1966 मध्ये 44 वर्षांच्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं.

केवळ 22 वर्षांची असताना सायरा बानोने 1966 मध्ये 44 वर्षांच्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 16 जून- हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमप्रकरणं, जगावेगळे विवाह, विवाहबाह्य संबंध यांचे किस्से अनंत आहेत. त्यात अगदी साध्यासाध्या व्यक्तींपासून ते दिग्गज अभिनेते अभिनेत्री यांचा समावेश आहे. पण मनोरंजन करणाऱ्या या बॉलिवूडमधील(Bollywood) किस्यांनी भरपूर मनोरंजन केलं आहे आणि अजूनही करत आहेत. एखादा अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात काय चाललंय, ते कोणाला डेट करत आहेत, त्याचं किंवा तिचं कितवं अफेअर चालू आहे पासून ते त्यांच्या लग्नापर्यंत सगळे किस्से वाचायला आणि सांगायला प्रेक्षक आणि चाहत्यांना आवडतं.

बॉलिवूडचे ट्रॅजेडि किंग दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar)  आणि सायरो बानो(Saira Banu) यांच्या लग्नाचा किस्सा तर अजरामर आहे. आजच्या पिढीतही लग्न करू इच्छिणाऱ्या प्रेमिकांच्या वयांत खूप अंतर असलं की या जोडप्याचं उदाहरण दिलं जातं. दिलीप कुमार हे हिंदी चित्रपटातले मोठे स्टार होते. सायरा बानो यांनी काही चित्रपटांत त्यांच्यासोबत काम केलं होतं. त्यानंतर त्यांची जवळीक झाली आणि केवळ 22 वर्षांची असताना सायरा बानोने 1966 मध्ये 44 वर्षांच्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं. त्या काळातील समाजाला नवरा-नवरीच्या वयातील अंतर इतकं असणं मान्य नव्हतं. त्यामुळे या लग्नाला खूप विरोध झाला होता पण सायराने निश्चयच केला होता की लग्न करीन तर दिलीप कुमारांशीच त्यामुळे ते दोघं खंबीर राहिले आणि नंतर सगळ्यांनी हे लग्न स्वीकारलं.  दैनिक जनसत्ताने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

(हे वाचा:रोहित रॉय होता सुष्मिताचा बॉयफ्रेंड?, पाहा अभिनेत्याची VIRAL पोस्ट   )

दिलीप भुलले विवाहित आसमाँच्या सौंदर्यावर

1981 मध्ये दिलीप-सायराच्या वैवाहिक आयुष्यात एक वादळ आलं. दिलीप कुमार हे विवाहित आणि तीन मुलांची आई असलेल्या आसमाँ रहमान या सौंदर्यवतीच्या प्रेमात पडले. त्यांची भेट हैदराबादमध्ये एका क्रिकेट मॅचवेळी झाली होती. या अफेअरची चर्चा इतकी झाली होती की लोकांचे प्रश्न टाळण्यासाठी दिलीप कुमार घराबाहेर पडायचे नाहीत. हे इतकं वाढलं की त्यांनी सायरा बानोला तलाक देऊन आसमाँशी 1981 मध्ये लग्नही केलं. पण हे लग्न फक्त 3 वर्षं टिकलं. आसमाँ आपल्याला धोका देत आहे हे लक्षात आल्यावर दिलीप यांनी 1983 मध्ये आपली दुसरी पत्नी आसमाँला तलाक दिला.

(हे वाचा:  'रस्त्यावर यायची वेळ आली होती'; आमिरने सांगितला भावुक करणारा प्रसंग )

त्यानंतर ते पुन्हा सायरा बानोकडे आले. सायरा बानोचं दिलीप कुमार यांच्यावर अफाट प्रेम होतं त्यामुळे तिने त्यांना माफ करून दिलीप कुमारांना पुन्हा स्वीकारलं. त्यानंतर ते दोघं एकत्र आहेत. आज दिलीप कुमार 98 वर्षांचे आहेत आणि सायरा बानो 76 वर्षांच्या. ते दोघं सतत बरोबर असतात. सायरा त्यांची उत्तम काळजी घेतात.

First published:

Tags: Bollywood News