मुंबई, 07 जानेवारी : बिल्डर समीर भोजवानी जागेसाठी दिलीप कुमार यांना वारंवार धमक्या देत होता. दिलीप कुमार आणि सायराबानो यांनी 250 कोटींचा मानहानीची नोटिस दिलीय. पण आता ट्रस्टींनी सांगितलंय, ती बंगल्याची जमीन दिलीप कुमार यांच्याकडे 999 वर्ष राहील.
सेठ मूलराज खटाऊ ट्रस्टनं सांगितलंय की दिलीपकुमार भाडेकरू नाहीत. त्यामुळे ही जमीन पुढची 999 वर्ष त्यांच्याकडेच राहील.
सायरा बानो यांनी न्यूज18 कडे आपली व्यथा मांडली होती. समीर भोजवानी हा बिल्डर गेल्या काही दिवसांपासून वारंवार आम्हाला धमकी देत आहे. त्याने आम्हाला घर खाली करण्याची धमकी दिली, असं बानो यांनी सांगितलं होतं.
दिलीप कुमार यांच्या कुटुंबीय या घरात दिलीप कुमार यांच्या वस्तूचं संग्रालय बनवणार आहे. परंतु तुरुंगातून सुटका झाल्यानंतर बाहेर आलेला बिल्डर समीर भोजवानीने या कामात अडथळा आणला.
सायरा बानो यांनी दावा केला आहे की, दिलीप कुमार यांनी मुंबईतील वांद्रे इथं आपला बंगला 1953 साली खरेदी केला होता. या बंगल्याची सर्व कागदपत्रं आपल्याकडे आहे. परंतु, समीर भोजवानी हा या घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे.
सायरा बानोने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबद्दल तक्रार केली होती. पंरतु, त्यांनी याबद्दल फक्त आश्वासनं दिली. आता सायरा बानो यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांना टि्वट करून मदतीची याचना केली.
दोन दिवसांपूर्वीच सायरा बानो यांनी पंतप्रधान मोदींना टि्वट केलं होतं. या टि्वटरमध्ये, 'दिलीप कुमार यांचं पाली हिल आणि वांद्र्यात घर आहे. बिल्डर समीर भोजवानी या जागेला हडपण्याच्या प्रयत्नात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, समीर भोजवानी नुकताच जेलमधून सुटला आहे. याआधी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी आश्वासन दिल्यानंतरही यात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पद्म विभूषण दिलीप कुमार यांना वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. याप्रकरणात मी तुम्हाला भेटू इच्छिते, कृपया मदत करा.' असं सायरा बानो यांनी म्हटलं होतं.
‘खिचडी’मधील हंसाचं पहिलं लग्न एका आठवड्यात तुटलं, आईशी भांडून केलं शाहिदच्या वडिलांशी लग्न