Home /News /entertainment /

वय वर्ष 84, आजही रोज या बाईकवर कसून वर्कआऊट करतो हा बॉलिवूड अभिनेता, पाहा VIDEO

वय वर्ष 84, आजही रोज या बाईकवर कसून वर्कआऊट करतो हा बॉलिवूड अभिनेता, पाहा VIDEO

सध्या धर्मेंद्र पंजाबमध्ये आपल्या शेतीत मन रमवतात. त्यांना शेती (Agriculture) करणं खूप आवडतं. इन्स्टाग्रामवर तिथं पिकवलेल्या फळांचे, पिकांचे अनेक फोटो ते शेअर करत असतात. (फोटो सौजन्यः Instagram @aapkadharam)

सध्या धर्मेंद्र पंजाबमध्ये आपल्या शेतीत मन रमवतात. त्यांना शेती (Agriculture) करणं खूप आवडतं. इन्स्टाग्रामवर तिथं पिकवलेल्या फळांचे, पिकांचे अनेक फोटो ते शेअर करत असतात. (फोटो सौजन्यः Instagram @aapkadharam)

अनेक जुन्या पिढीतील अभिनेत्यांचा फिटनेस अगदी तरुणांनाही लाजवेल असा आहे. हा व्हिडिओ तुम्हालाही प्रेरणा देईल.

  मुंबई, 1 फेब्रुवारी : बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक सेलिब्रिटीज आपल्या फिटनेससाठी (fitness) प्रसिद्ध आहेत. मात्र यात केवळ तरुण पिढीतले अभिनेतेच नाहीत. पन्नाशीच काय सत्तरी ओलांडलेले अनेक अभिनेते स्वतःला फिट ठेवतात. यात ठळक नाव आहे धर्मेंद्र (Dharmendra) यांचं. 84 वर्षांच्या धर्मेद्र यांची फिट आणि हेल्दी लाइफस्टाइल अनेकांसाठी प्रेरक ठरते. ते सगळ्या गोष्टी वेळच्यावेळी करतात आणि या सगळ्याबाबत सोशल मीडियावरही सतत माहिती देत असतात. मध्यंतरी धर्मेंद्र यांनी असाच एक व्हिडिओ (video) सोशल मीडियावर (social media) शेअर केला. त्यात ते आपल्या घरातच अतिशय व्यवस्थित आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं वर्कआउट (workout) करत होते.
  अनेकदा लोक वय वाढले की विविध कारणं सांगत आरोग्य आणि व्यायाम टाळण्याकडे झुकतात. मात्र वयापलिकडे जात फिटनेसचा विचार महत्त्वाचा आहे हे धर्मेंद्र आपल्या जगण्यातूनच सांगत राहतात. स्टेशनरी बाईकवर (stationary bike) व्यायाम (exercise) करतानाचा हा धर्मेंद्र यांचा व्हिडिओ प्रत्येकाच्या मनात व्यायामाबाबत उत्साह निर्माण करणारा आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ते म्हणतात, की या बाईकवर मी दररोज अर्धा तास व्यायाम करतो. निरोगी (healthy) आणि फीट राहायला ते सोशल मीडियावर सगळ्यांना सतत आवाहन करत विविध मार्गांनी प्रोत्साहन देत राहतात. अनेकदा वेळ नसल्यानं जीममध्ये जाणं शक्य होत नाही. अशावेळी स्टेशनरी बाईक हा एक उत्तम पर्याय आहे. सर्व वयोगटातील लोक या बाईकवर व्यायाम करू शकतात. या बाईकवर 30 ते 40 मिनिटांचा व्यायाम केल्यास 80-100 कॅलरीज बर्न होतात. शिवाय मेंदू, हृदय आणि इतर अवयव कार्यक्षम राहतात.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Social media, Video, Workout

  पुढील बातम्या