मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लाइफ @25: बोमन इराणी! वेटर ते अॅक्टर; कशी मिळाली अभिनयाची ग्लॅमरस वाट

लाइफ @25: बोमन इराणी! वेटर ते अॅक्टर; कशी मिळाली अभिनयाची ग्लॅमरस वाट

वयाचा एक टप्पा गाठल्यानंतर अभिनय क्षेत्रात येणाऱ्या बोमन इराणी यांच्यासारख्या कलाकाराला ही अभिनयाची ग्लॅमरस वाट कशी भेटली जाणून घेऊया News 18lokmat digital च्या  Digital Prime Time Specialमध्ये.

वयाचा एक टप्पा गाठल्यानंतर अभिनय क्षेत्रात येणाऱ्या बोमन इराणी यांच्यासारख्या कलाकाराला ही अभिनयाची ग्लॅमरस वाट कशी भेटली जाणून घेऊया News 18lokmat digital च्या Digital Prime Time Specialमध्ये.

वयाचा एक टप्पा गाठल्यानंतर अभिनय क्षेत्रात येणाऱ्या बोमन इराणी यांच्यासारख्या कलाकाराला ही अभिनयाची ग्लॅमरस वाट कशी भेटली जाणून घेऊया News 18lokmat digital च्या Digital Prime Time Specialमध्ये.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 31 ऑगस्ट: 3 इडियट्समधील 'व्हायरस' असो किंवा मुन्नाभाई MBBSमधील 'डॉक्टर' असो ही पात्र आठवली की डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे अभिनेता बोनम इराणी. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे बोमन इराणी अभिनयाच्या वाटेवर फार उशिरा आले पण तेव्हापासून त्यांनी धरुन ठेवलेली ही वाट अविरतपणे पुढे चालू आहे.  वयाच्या साधारण 22-24व्या वर्षी आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे कळलेलं असतं. पण अभिनय क्षेत्रात अस फार कमी वेळा होत असेल. वयाचा एक टप्पा गाठल्यानंतर अभिनय क्षेत्रात येणाऱ्या बोमन इराणी यांच्यासारख्या कलाकाराला ही अभिनयाची ग्लॅमरस वाट कशी भेटली जाणून घेऊया News 18lokmat digital च्या  Digital Prime Time Specialमध्ये.

अभिनेते बोनम इराणी यांचा जन्म 2 डिसेंबर 1959 सालचा मुंबईतील. जन्म होण्याआधी 3 महिने आधी वडिलांचं छत्र हरवल्यानं बोमन यांचं बालपण खडतर गेलं. घरची आर्थिक स्थिती हालाखीची असल्यानं बोमन यांनी फार कमी वयात खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केली. या प्रवासात त्यांना खरं यश वयाच्या 42व्या वर्षी मिळाली.

जन्म होण्याआधीच वडिल गेल्यानं बोमन यांची आईच त्यांचे वडिल झाली. बोमन यांचा जन्म जरी मुंबईचा असला तर त्यांचं शालेय शिक्षण हे पुण्याच्या एसटी मॅरी शाळेत झालं. तुटकं, तोतर बोलणारे बोमन शाळेत सगळ्यात ढ मुलांमध्ये गणले जायचे. शाळेत असताना त्यांना 'डिसलाफिंग' नावाचा आजार होता. ज्यात मुलांना काही शब्द ओळखणं कठिण होत आणि ते शब्द बोलताना देखील ते अडखळतात. या आजारावर बोमन यांनी ट्रिटमेंट देखील घेतली.

वेटर बनवण्यासाठी कोर्स केला

डिसलाफिंगचा आजार असलेले बोमन पुण्यातील शालेय शिक्षण संपवून मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमध्ये आले. तिथे त्यांनी वेटर बनवण्याचा कोर्स केला. त्यानंतर मुंबईतील ताजमहाल पॅलेस अँड टॉवरमध्ये  ते वेटर आणि रुम सर्विसर म्हणून काम करू लागले.  जवळपास 2 वर्ष त्यांनी इथे काम केलं. त्यानंतर  ते घरी परतले आणि वडिलांच्या  निधनांनतर घर चालवण्यासाठी आई जी बेकरी शॉप चालवायची त्याची सगळी सूत्र बोमन यांनी आपल्या हातात घेतली.  हे बेकरी शॉप मुंबईच्या ग्रँड रोडवर असलेल्या नॉवेल्टी आणि अप्सरा सिनेमाच्या मध्ये होती.

बोमन यांना लहानपणापासून सिनेमा पाहण्याचीही आवड. वेळ मिळेल तसे ते थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायचे. वयाच्या 32 वर्षांपर्यंत बोनम यांनी त्यांच्या वडिलांचं बेकरी शॉप चालवलं.  बेकरीमधून येणाऱ्या पैशांमधून त्यांचं घर चालायचं. ज्या वयात आताचे तरूण सेटल होऊ पाहतात, आपली पर्सनॅलिटी घडवतात त्या वयात बोनम मात्र स्वत:साठी काहीच करत नव्हते जेणेकरून लोकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण होईल.  आपण जगावेगळं नाही निदान आता जे काम करतोय त्यापेक्षा काही तरी वेगळं करायचं असा किडा बोमन यांच्या डोक्याच शिरला.

स्वत:साठी घेतला कॅमेरा

बेकरी शॉपमधून येणारे पैशांमधून बोमन यांनी  काही पैसे वाचवले आणि स्वत:साठी एक कॅमेरा विकत घेतला.  PENT AX K100 हा त्यांचा पहिला कॅमेरा ज्याची किंमत 2700 रुपये होती. बेकरीचं काम आटोपलं की बोमन कॅमेरा घेऊन शाळेच्या ग्राऊंडवर जायचे. तिथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचे फोटो काढायचे आणि ते फोटो 20-30 रुपयांना विकायचे. त्यानंतर अनेक लहान मोठ्या इव्हेंटमध्ये त्यांनी फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली. 1991मध्ये त्यांनी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे फोटो काढले.

मिळाला पहिला सिनेमा

हे सगळं करत असताना बोमन यांना अभिनयाचं प्रचंड वेड होतं. त्यांनी 1981-1983मध्ये हंसराज सिद्धिकी यांच्याकडून ट्रेनिंग घेतली होती.  त्यानंतर त्यांनी अनेक थिएटर शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली.  त्याचप्रमाणे 'क्रक जॅक', 'फॅन्टा' सारख्या जाहिरातींमध्ये काम केली. हे सगळं करत असताना बोमन यांचं टॅलेंट विनोद चोप्रा यांनी हेरलं. त्यांनी बोमन यांना बोलावून हातात 2 लाख रुपयांचा चेक केला आणि त्यांच्या पुढच्या सिनेमात बोमन यांना कास्ट केलं. तो सिनेमा म्हणजे 'मुन्नाभाई MBBS'. यावेळी बोमन यांचं वय 42 वर्ष होतं.   सिनेमात त्यांनी साकारलेल्या डॉक्टरच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला.

मुन्नाभाई MBBS सिनेमापासून सुरू झालेला बोमन ईराणी यांचा प्रवास आजपर्यंत अवितर सुरू आहे. त्यानंतर त्यांनी 'मैं हू ना', '3 इडियट्स', 'लगे रहो मुन्नाभाई', 'खोसला का घोसला', 'नो एंट्री', 'डॉन', 'पीके' सारख्या दमदार सिनेमात काम केलं.

अभिनेते बोमन इराणी यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये अनेक भूमिका केल्यात. त्यांना आता आयुष्यात एक चांगला डिरेक्टर व्हायचं आहे.  ते म्हणतात, आयुष्यात एखाद स्वप्न नक्की असावं आणि प्रत्येकाचं असतं.  माझी इच्छा आहे की मला अवॉर्ड विनींग डिरेक्टर बनायचं आहे आणि मी ही इच्छा एकदिवस नक्की पूर्ण करेन.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Digital prime time