मुंबई, 29 मार्च: कोरोना (coronavirus) ला येऊन आता जवळपास एक वर्ष उलटलं आहे. हात धुणे, सॅनिटायझिंग (sanitizing) करणे, सोशल डिस्टन्सिंग (social distancing) पाळणे, कोरोनाच्या वारंवार टेस्ट करणे, साफसफाई ठेवणे या गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत. जवळपास एक वर्षापूर्वी आपण सगळेच या बदलाला स्विकारायला तयार नव्हतो. पण आता मात्र हे सगळं अतिशय नॉरमल झालं आहे. पण तुम्हाला माहित आहेका अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) ला या सगळ्या गोष्टी आधीपासूनच माहित होत्या. 1997 मधे म्हणजे जवळपास चोविस वर्षांपूर्वीच त्याला कोरोना ची चाहूल लागली होती. इतकच नाही तर आताची RT-PCR टेस्ट ही त्याने त्यावेळी केली होती.
'सुशांत, तुझ्यामुळेच आम्हाला सिनेमाच्या ऑफर्स येऊ लागल्या', TV कलाकाराने केला खुलासा
बॉबीचा एक व्हिडीयो तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तो चक्क अभिनेत्री एश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bacchan) ची कोरोना टेस्ट (corona test) करत असल्याचं नेटकरी म्हणतायत. 1997 साली आलेला और प्यार हो गया Aur Pyar Ho Gaya चित्रपटातील हा व्हिडीयो आहे.
हाच तो व्हिडीयो
View this post on Instagram
हे पहिल्यांदाच घडतंय असं नाही बॉबी ने य़ाधीही टाईम ट्रॅव्हलर प्रमाणे गोष्टी केल्या असल्याचा दावा नेटकरी करत आहेत. 2008 मधील त्याचा चित्रपट चमकू (chamku) मधे त्याने चक्क वायरलेस एअर पॉड्स (wireless airpods) परिधान केले आहेत.
Lord Bobby using AirPods in 2008 pic.twitter.com/PqwJZ5EHsk
— Bobbywood (@Bobbywood_) March 8, 2021
ज्यावेळी मोबाईल, इंटरनेट च जास्त फ्याड आलही नव्हतं त्या काळात बॉबी कडे हे वायरलेस एअर पॉड्स आले कुठून असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. तर हे Apple चेच वायरलेस एअर पॉड्स असल्याचही म्हटलं जात आहे. जेव्हा की Apple कंपनीने 2016 मधे हे (Bluetooth) ब्लुटूथ वायरलेस एअर पॉड्स लॉन्च केले होते. आता हे सगळं चित्रपटातील असलं तरीही नेटकरी याचां चांगलाच आनंद घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Corona, Entertainment