मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /माल्हा सिन्हा यांच्या कुशीत लपलेल्या चिमुकल्याला ओळखलं का, बाप आणि भाऊ देखील आहे सुपरस्टार

माल्हा सिन्हा यांच्या कुशीत लपलेल्या चिमुकल्याला ओळखलं का, बाप आणि भाऊ देखील आहे सुपरस्टार

बाप सुपरस्टार आणि मुलगा देखील आहे लोकप्रिय अभिनेता

बाप सुपरस्टार आणि मुलगा देखील आहे लोकप्रिय अभिनेता

बॉलिवूड अभिनेत्री माला सिन्हा यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. माला यांच्या कुशीत दिसणारा हा चिमुकला आज बॉलिवूडमधील एक नावाजलेलं नाव आहे.

मुंबई, 24 मे- बॉलिवूड अभिनेत्री माला सिन्हा यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये माला सिन्हा एका वेगळ्याच स्टाईलमध्ये तर दिसत आहेत पण त्यांच्या कुशीत एक गोंडस चिमुकला दिसत आहे. माला यांच्या कुशीत दिसणारं हा चिमुकला आज बॉलिवूडमधील एक नावाजलेलं नाव आहे. हा फोटो समोर आल्यापासून सोशल मीडियावर प्रत्येकजण या मुलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुम्ही देखील या मुलाला ओळखला का?

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे बालपणापासून बॉलिवूड चित्रपटांच्या सेटवर भेट देत असतात. या स्टार्सचं बालपण आणि तारुण्य दोन्ही जगमगत्या दुनयेत गेलं आहे. काही मुले अशी आहेत जी आपल्या वडिलांसोबत चित्रपटाच्या सेटवर गेली आहेत आणि वडिलांसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींसोत खेळत असतं. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. माला सिन्हाच्या यांच्या कुशील लपलेला हा चिमुकल्याने सिनेमा जगत गाजवलं आहे. आजही हा चिमुकला इंडस्ट्रीत सक्रीय आहे. या स्टारकिडचे वडील देखील इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध स्टार आहेत.

वडील आणि भावाप्रमाणे त्यांनी अभिनयक्षेत्रात केले करिअर

तुम्ही या फोटोत दिसणाऱ्या मुलाला ओळखू शकत नसाल तर त्याचं नाव सांगूनच टाकतो. माला सिन्हाच्या मांडीवर दिसणारा हा मुलगा दुसरा कोणी नसून बॉबी देओल आहे. बॉबी देओल हा हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा आहे. हा फोटो त्या वेळचा आहे जेव्हा बॉबी त्याचे वडील धर्मेंद्र सोबत शूटवर गेला होता. या फोटोत बॉबी देओल ही पहाडी कॅप घालून खूपच क्यूट दिसत आहे.

वाचा-'त्याला माझी अंतर्वस्त्रे...'दिग्दर्शकाबद्दल प्रियांका चोप्राचा धक्कादायक खुलासा

ओटीटीचा सुपरस्टार

बॉलिवूडमध्ये बॉबी देओलने आपल्या अभिनय कारकिर्दीत सोल्जर, हमराज, अजनबी, बरसात आणि दिलगी अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण एक काळ असा आला जेव्हा बॉबी देओलच्या करिअरचा आलेख घसरण्यास सुरुवात झाली. पण या अभिनेत्याने हार मानली नाही, त्याने ओटीटीकडे मोर्चा वळवला. आश्रम या वेब सीरिजच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने सर्वांना ओटीटीवर वेड लावले.

बॉबी देओलच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर यावर्षी त्याचा सुपरहिट चित्रपट 'अपने' च्या दुसरा भाग येऊ शकतो. या चित्रपटात पुन्हा एकदा बॉबी देओलसोबत वडील धर्मेंद्र आणि भाऊ सनी देओलची जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय बॉबी देओल यावर्षी अॅनिमल या चित्रपटातही झळकणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment