ज्या कुत्र्याला फिरवलं त्याच्याच गळ्यातील दोरीनं गळफास; आसिफ बसरा यांच्या आयुष्यातील शेवटचे क्षण

ज्या कुत्र्याला फिरवलं त्याच्याच गळ्यातील दोरीनं गळफास; आसिफ बसरा यांच्या आयुष्यातील शेवटचे क्षण

बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा (Asif Basra) यांनी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे.

  • Share this:

धर्मशाळा, 12 नोव्हेंबर : ब़ॉलिवूड  अभिनेता आसिफ बसरा (Asif Basra) यांनी आत्महत्या केली आहे. धर्मशाळा मधील मॅक्डोलगंजच्या जोगिबाडा रोडवर असणाऱ्या एका कॅफेजवळ त्यांनी गळफास घेतला आहे. गळफास घेण्याआधी आपल्या लाडक्या कुत्र्यासोबत त्यांनी फेरफटका मारला आणि घरी आल्यावर त्याच कुत्र्याच्या गळ्यातील दोरीनं गळफास घेतला.

आसिफ बसरा यांनी  वयाच्या 53 व्या वर्षी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. त्यांच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समजलं नाही. आसिफ बसरा गेल्या 5 वर्षांपासून मॅक्डोलगंजमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्याबरोबर त्यांची एक विदेशी मैत्रीणदेखील राहत असे. UK मधील एका महिलेबरोबर ते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. गुरुवारी दुपारी ते त्यांच्या कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर कुत्र्याच्या दोरीलाच त्यांनी गळफास घेतला.

गेल्या काही काळापासून ते नैराश्याचा सामना करत होते, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी या प्रकरणाची पुष्टी केली असून पोलीसया प्रकरणाचे सखोल चौकशी करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा - मोठी बातमी! Drug Case मध्ये प्रसिद्ध अभिनेत्याची होणार चौकशी, NCB ने पाठवला समन

आसिफ बसरा एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘परजानियां’ ब्लॅक ‘फ्रायडे’ याबरोबच त्यांनी अमेरिकन कॉमेडी सिनेमा आउटसोर्समध्ये देखील काम केले होते. हिमाचली सिनेमा सांझमधील त्यांचा अभिनय विशेष गाजला होता. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' या सिनेमात त्यांनी अभिनेता इम्रान हाश्मीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

Published by: Priya Lad
First published: November 12, 2020, 5:11 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या