मुंबई, 13 एप्रिल- अर्शद वारसी
(Arshad Warsi) नेहमीच आपल्या विनोदी स्वभावाने सर्वांना हसवत असतो. मात्र या लेटेस्ट न्यूजमुळे अभिनेत्याचे चाहते चिंतेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अर्शद वारसी उद्या मुंबईतील मेडिकल सुपर स्पेशालिटीमध्ये शस्त्रक्रियेसाठी जाणार आहे. अर्शद सध्या दिग्दर्शक-निर्माता-लेखक अभिषेक डोगरा यांच्या क्राईम-कॉमेडी चित्रपट 'जीवन भीमा योजना' साठी मुंबईत शूटिंग करत आहे.
या चित्रपटात त्याच्यासोबत बिजेंद्र काला, संजीदा शेख आणि पूजा चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत.
परंतु आज त्याने अचानक चित्रपटाचे शूटिंग थांबवले आणि प्रथम त्याच्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनतर डॉक्टरांनी त्याला उद्या शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की अर्शदला नेमकं काय झालं आहे? कशासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे?
ETimes च्या रिपोर्टनुसार, प्रॉडक्शन क्रूच्या एका सदस्याने सांगितले की, ''अर्शद वारसीला गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता जाणवत होती. टीमला आज अर्शदसोबत काही महत्त्वाचे सीन शूट करायचे होते, परंतु काम मध्येच थांबवावे लागले. क्रू मेंबर म्हणाला, "अर्शद सर सध्या त्यांच्या घराजवळील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत आणि उद्या त्यांच्यावर किडनी स्टोनची शस्त्रक्रिया होऊ शकते''.

क्रू मेंबर पुढे म्हणाला, “उद्या सकाळी अर्शद वारसीला शस्त्रक्रियेसाठी नेले जाईल. गेल्या काही दिवसांपासून ते बिघडलेल्या हवामानामुळे जाऊ शकत नव्हते, मात्र आता प्रकृतीच बिघडत असल्याचे जाणवल्याने त्यांनी आता डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांना पुढील 15 दिवस पूर्ण विश्रांती, औषधे आणि जेवण वेळेवर घेण्याचा आणि महत्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.शस्त्रक्रियेनंतर बरे झाल्यानंतरही त्यांना आणखी काही दिवस विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे डॉक्टर जेव्हा त्याला कामावर परतण्याची परवानगी देतील तेव्हाच चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल''.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.