Home /News /entertainment /

'प्रतीक्षा नाही होतं'; म्हणत अर्जुन कपूरने शेयर केला मलायकाचा फोटो

'प्रतीक्षा नाही होतं'; म्हणत अर्जुन कपूरने शेयर केला मलायकाचा फोटो

बॉलिवूड(Bollywood) अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीचं आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात.

    मुंबई, 3 ऑगस्ट-  बॉलिवूड(Bollywood) अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीचं आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. या दोघांमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. त्यामुळे सतत हे दोघे सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा होतं असतात. मात्र या दोघांना या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. मात्र हे दोघेही मीडियासमोर कधीही आपल्या नात्याबद्दल खुलासा करत नाहीत. अलीकडे हळूहळू हे दोघेही आपल्या रिलेशनशिपला सर्वांसमोर आणताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अर्जुनच्या वाढदिवसाला मलायकाने त्याच्यासोबतचा रोमँटिक फोटो शेयर करत शुभेच्छा दिल्या होत्या. तर आत्ता अर्जुनने मलायकाचा फोटो शेयर करत आता वाट नाही पाहू शकत असं म्हटलं आहे. अभिनेत्री मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला होता. यामध्ये तिनं सांगितल होतं की, ‘मी एक न्यूड मील नावाचा नवा प्रोजेक्ट घेऊन येत आहे. आणखी काहीही गुपित नाहीय...मी असं काही बनवत आहे, जे तुमच्या आणि माझ्यासाठीसुद्धा रोमांचकारक असणार आहे. माझ्यासोबत सर्वात चविष्ट आणि पौष्टिक अन्न खाण्यासाठी तयार राहा’. अशा आशयाचा हा व्हिडीओ होता. (हे वाचा: 'जीजू जेल में और...'; राज कुंद्रा प्रकरणामुळे सलूनमध्ये जाणारी शमिता झाली ट्रोल) आत्ता अर्जुन कपूरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मलायकाचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती काही तरी डिश बनवताना दिसत आहे. सोबतच कॅप्शन देत अर्जुनने म्हटलं आहे, ‘आत्ता वाट नाही पाहू शकत’. अर्जुनच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर या जोडीची बरीच चर्चा रंगली आहे. याआधी मलायकाने अर्जुनचा फोटो शेयर करत खास कॅप्शन दिलं होतं. तर आत्ता अर्जुनने असं सोशल मीडियावर मलायकाबद्दल पोस्ट केली आहे. त्यामुळे हे दोघेही आत्ता आपलं नातं सोशल करत असल्याचं दिसत आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Arjun kapoor, Malaika arora

    पुढील बातम्या