मलायकामुळे अर्जुनवर होतेय टीका, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

अर्जुन आणि मलायकाच्या नात्यात वयाचं खूप मोठं अंतर आहे. मलायका 45 वर्षांची आहे तर अर्जुन 33 वर्षांचा आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 06:09 PM IST

मलायकामुळे अर्जुनवर होतेय टीका, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

मुंबई, 07 जून : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. एका मुलाखतीमध्ये अर्जुनने मालायकासोबतचं त्याचं नात स्वीकारलं. त्यांच्या अफेअरमुळे मागच्या काही महिन्यांपासून मलायका आणि अर्जुन बी टाऊनमध्ये खूप जास्त चर्चेत होते. पण अनेकदा त्यांच्या वयातील अंतरामुळे मलायका-अर्जुनला ट्रोलही व्हावं लागलं होतं. पण नुकतचं त्याला याबाबत विचारण्यात आल्यावर त्यांनं यावर सडेतोड उत्तर दिलं.

अर्जुन आणि मलायकाच्या नात्यात वयाचं खूप मोठं अंतर आहे. मलायका 45 वर्षांची आहे तर अर्जुन 33 वर्षांचा आहे. म्हणजेच मलायका अर्जुनपेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे हे दोघंही अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले होते. या ट्रोलिंगबाबत अर्जुनला प्रश्न विचारण्यात आल्यावर अर्जुन म्हणाला, 'मला या सर्व गोष्टींचा काहीही फरक पडत नाही.मी अशा लोकांविषयी मला अजिबात काही बोलायचं नाही. कारण जर मी या लोकांबद्दल बोललो तर मी त्यांना महत्त्व देतोय असं होईल जे लोक माझ्या अजिबात महत्त्वाचे नाहीत.'

श्रीदेवींच्या सावत्र मुलीनं उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर शेअर केले फोटोLoading...


 

View this post on Instagram
 

Happy happy Sunday 🐝🌼🌻🌞p.s .... my bff @preetasukhtankar u take the best pics


A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुननं त्याच्या नात्याविषयी अनेक खुलासे केले. अर्जुन म्हणाला, 'मी आता हे नातं सर्वांपासून लपवायच्या मूडमध्ये नाही. मला मीडियाकडूनच हे सर्वांसमोर मांडण्याची हिंमत मिळाली. पण सध्या माझा लग्नाचा कोणताही प्लान नाही. पण जेव्हाही मी लग्न करेन त्यावेळी मी सर्वांना नक्की सांगेन.'

घटस्फोटाच्या एक वर्षानंतरच ज्वाला गुट्टाला डेट करतोय हा अभिनेता
काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि मलायका यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र नंतर त्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं. मलायका आणि अर्जुन मागच्या 1 वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर अर्जुन-मलायकाच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी मलायकाच्या फोटोवरील अर्जुनची कमेंट खूप व्हायरल झाली होती.

जिमच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद झाला इम्रान खान, ओळखताही येणं अशक्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...