Home /News /entertainment /

अर्जुन कपूरची बॉलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण, लिहिली इमोशनल पोस्ट

अर्जुन कपूरची बॉलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण, लिहिली इमोशनल पोस्ट

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) फारच कमी वयात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. एक स्टारकिड असूनसुद्धा या अभिनेत्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अर्जुनने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत.

पुढे वाचा ...
  मुंबई, 11 मे-   बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेता अर्जुन कपूरने   (Arjun Kapoor)  फारच कमी वयात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. एक स्टारकिड असूनसुद्धा या अभिनेत्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अर्जुनने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. अर्जुन आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. मग त्याचा चित्रपट असो किंवा मलायका अरोरासोबत रिलेशनशिप अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीची नेहमीच चर्चा होत असते. दरम्यान अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन तब्बल 10 वर्षे   (Arjun Kapoor's 10 Year in Bollywood)  झाली आहेत. अर्जुनने स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. अर्जुन कपूरने आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. अर्जुन कपूरने 'ईशकजादे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. हा चित्रपट 11 मे 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अर्जुनसोबत अभिनेत्री परिणिती चोप्रा झळकली होती. या दोघांची थ्रिलर लव्हस्टोरी प्रेक्षकांना आणि खासकरून तरुणांना प्रचंड पसंत पडली होती. तसेच या चित्रपटातील गाण्यांनीसुद्दा प्रेक्षकांना वेड लावलं होतं. अर्जुन कपूरने या चित्रपटात येण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात आपलं वजन कमी केलं होतं. दरम्यान अर्जुनने इंडस्ट्रीमध्ये 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात एक पोस्ट शेअर केली आहे. अर्जुन कपूर पोस्ट- ''माझ्या आयुष्यातील प्रत्येक सेकंदाला आणि श्वासाला 10 वर्षे जगणारा हिंदी सिनेमा. मी आदि सर, @yrf आणि माझे दिग्दर्शक #HabibFaisal यांचा #Ishaqzaade एक हिंदी चित्रपट नायक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा चित्रपट दिल्याबद्दल खरच ऋणी आहे! @parineetichopra ला मला मिळालेली सर्वात जबरदस्त पहिली सहकलाकार म्हणून खूप खूप धन्यवाद.अनेक आठवणी, प्रचंड नॉस्टॅल्जिया आणि जबरदस्त प्रेम - हा चित्रपट फक्त देत राहतो. कमी आत्मविश्वास असलेल्या मुलावर तुम्ही विश्वास ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार!
  View this post on Instagram

  A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

  ''एक कलाकार म्हणून, मला हे सांगायला अभिमान वाटतो की मी #WorkInProgress आहे, प्रत्येक चित्रपट माझ्या कलेला अधिक चांगले बनवण्याची शिकण्याची संधी आहे. खरच भाग्यवान आहे की मला असे निर्माते आणि दिग्दर्शक मिळाले ज्यांनी मला वेळोवेळी शिक्षा केली. हा एका नरकाचा प्रवास झाला आहे. अनेक चढ- उतार वाटेत माझे आशीर्वाद मोजत आहेत. तुमच्या सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी मी एक दशकभर प्रयत्न करत आहे. भविष्यात आणखी प्रयत्न करण्याचे वचन देऊन. प्रेम, हसू, अश्रू, समर्थन आणि दयाळूपणाबद्दल सर्वांचे आभार. लव्ह यू'' आज अभिनेत्याच्या या फिल्मी कारकिर्दीला तब्बल 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 10 वर्षात अर्जुनने बॉलिवूडमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. खाजगी आयुष्याबाबत बोलायचं तर, अर्जुन कपूर सध्या मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ते दोघे सतत एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Arjun kapoor, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या