मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अरबाज खानची गर्लफ्रेन्ड Giorgia Andriani ने दुबईत केली उंटाची स्वारी; पाहा VIRAL VIDEO

अरबाज खानची गर्लफ्रेन्ड Giorgia Andriani ने दुबईत केली उंटाची स्वारी; पाहा VIRAL VIDEO

बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) अरबाज खानची (Arbaaz Khan) गर्लफ्रेन्ड जॉर्जिया अँड्रियानीने (Girlfriend Giorgia Andriani) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे.

  नवी दिल्ली, 24 जानेवारी: बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेन्ड जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून खूप पसंती मिळते. जॉर्जिया अँड्रियानी सध्या दुबईत सुट्ट्या घालवत आहे. ती दुबईत असली तरी तेथून ती अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. जॉर्जियाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये ती एका उंटाची स्वारी करत आहे. या व्हिडीओमध्ये तिचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळत आहे. जॉर्जिया अँड्रियानीने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला असून 30 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. ही अभिनेत्री या व्हिडिओत दुबईच्या वाळवंटात एका उंटावर स्वार झालेली दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'लुडो' चित्रपटातील संगीत वाजत आहे. तसेच तिने या गाण्याचे बोल कॅप्शनमध्ये वापरले आहेत. तिने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "ओह बेटा जी ..."
  जॉर्जिया अँड्रियानीने दुबईतील आणखी बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तिच्या एका फोटोत ती कारच्या समोर उभी आहे.  ज्यामध्ये तिने ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज दिली आहे. जॉर्जियाने अशाप्रकारचे फोटो पहिल्यांदाच शेअर केलेत, असं नाही. तिने यापूर्वीही ग्लॅमरस लुकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
  जॉर्जिया अँड्रियानी नुकतीच 'रूप तेरा मस्ताना' या अल्बममध्ये दिसली. या अल्बममध्ये तिने मीका सिंगसोबत काम केलं आहे. हे गाणं खूपचं गाजलं आहे. याव्यतिरिक्त जॉर्जिया लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपदेसोबत ती एका नव्या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी जॉर्जियाने 'कॅरोलीन अॅण्ड कामाक्षी' या तामिळ वेब सीरीजमध्ये इटालियन एजंटची भूमिका साकारली होती.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bollywood News

  पुढील बातम्या