मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Anil Kapoor करतायंत गंभीर आजाराशी सामना? जर्मनीतून समोर आलेल्या Video मुळे चाहते चिंतेत

Anil Kapoor करतायंत गंभीर आजाराशी सामना? जर्मनीतून समोर आलेल्या Video मुळे चाहते चिंतेत

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor Latest news) यांच्या चाहत्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. अनिल कपूर यांचा एक व्हिडीओ (Anil Kapoor Video) समोर आला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 27 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor Latest news) यांच्या चाहत्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. अनिल कपूर यांचा एक व्हिडीओ (Anil Kapoor Video) समोर आला आहे. सध्या ते जर्मनीत असून या दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यातील व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. यामध्येच त्यांनी अशी माहिती दिली आहे की, त्यांच्यावरील उपचाराचा (Anil Kapoor Treatment) हा शेवटचा दिवस आहे आणि ते डॉक्टरांना भेटणार आहेत.

या संपूर्ण व्हिडीओमध्ये अनिल कपूर (Anil Kapoor Ill) जर्मनीतील एका रस्त्यावर चालताना दिसत आहेत. यावेळी हलकीशी बर्फवृष्टी देखील होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अनिल कपूर यांनी अशी कॅप्शन दिली आहे की, 'बर्फावरील एक परफेक्ट वॉक. जर्मनीतील शेवटचा दिवस! उपचाराच्या शेवटच्या दिवसासाठी डॉ. मुलर यांना भेटण्यासाठी निघालो आहे. त्यांचे आणि त्यांच्या जादुई स्पर्शाबद्दल आभार!

View this post on Instagram

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

हा व्हिडीओ शेअर करताना अनिल कपूर यांनी बॅकग्राउंडमध्ये मोहित चौहानचे 'फिर से उड चला..' हे गाणं देखील वापरलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या विविध कमेंट्स येत आहेत. बहुतांश वेळी परदेशात एखाद्या मोठ्या आजारवर उपचार घेण्यासाठी सेलिब्रिटी पोहोचतात, त्यामुळे या व्हिडीओनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेकांनी त्यांना त्याबाबत कमेंट करून विचारले आहे. मात्र अद्याप तसं कोणतही स्पष्टीकरण अभिनेते किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आले आहे.

हे वाचा-प्रत्येक चित्रपटाचं भविष्य ठरवणाऱ्या बॉक्स ऑफिसचा रोमहर्षक इतिहास माहिती आहे का?

कोणत्या आजाराचा सामना करतायंत अनिल कपूर?

एका दशकापेक्षाही जास्त काळापासून अनिल कपूर अॅचिलीस टेंडिनाइटिस (Anil Kapoor Suffering from Achilles Tendinitis ) या आजाराने त्रस्त आहेत.

View this post on Instagram

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

याबाबत त्यांनी स्वत: खुलासा केला होता. गेल्यावर्षी या आजारपणाबाबत माहिती देताना ते जर्मनीतील डॉ. मुलर यांच्याकडून उपचार घेत असल्याचे म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी अशी माहिती दिली होती की ते एखादी सर्जरी न करता उपचार घेत आहेत.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor