मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD: जेव्हा अतुल अग्निहोत्री पडला सलमानच्या बहिणीच्या प्रेमात; त्यानंतर नेमकं काय घडलं

HBD: जेव्हा अतुल अग्निहोत्री पडला सलमानच्या बहिणीच्या प्रेमात; त्यानंतर नेमकं काय घडलं

 अतुलने सलमानची बहीण अलविरासोबत लग्न केलं आहे.

अतुलने सलमानची बहीण अलविरासोबत लग्न केलं आहे.

अतुलने सलमानची बहीण अलविरासोबत लग्न केलं आहे.

मुंबई, 24 जून- अभिनेता अतुल अग्निहोत्री(Atul Agnihotry Birthday) बॉलिवूड (Bollywood)  दबंग सलमान खानचा (Salman Khan) भावोजी आहे. अतुलने सलमानची बहीण अलविरासोबत लग्न केलं आहे. मात्र हे लग्न इतकं सोपं नव्हतं. आज अतुल अग्निहोत्री यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया सलमानची बहीण अलविरा आणि अतुल यांच्या लव्हस्टोरीत नेमकं काय घडलं होतं.

सलमान खानच्या कुटुंबातील अनेक सदस्य बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. मात्र सलमानच्या दोन्ही बहिणी चित्रपटांपासून दूर आहेत. बहीण अर्पिता कधीकधी चर्चेत असते. मात्र निर्माती असणारी अलविरा नेहमीच कॅमेरापासून दूर असते. मात्र अलविरा एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती. आणि त्याच्याशीचं तिनं लग्नसुद्धा केल आहे. हा अभिनेता म्हणजे अतुल अग्निहोत्री होय. अतुलने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम केलं आहे. तसेच त्याने सलमान खानसोबतही काम केलं आहे.

(हे वाचा: थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका )

1993 मध्ये सलमान खानच्या ‘जागृती’ या चित्रपटाचं शुटींग चालू होतं. या चित्रपटात अलविरा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. तर या चित्रपटात अतुलसुद्धा होता. याच चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अतुल आणि अलविरा जवळ आले होते. चित्रपटामुळे अतुल आणि अलविरामध्ये भेटीगाठी सुरु झाल्या होत्या. आणि नंतर या दोघांनीही एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र खरं सांगायचं तर अतुल खुपचं घाबरला होता. कारण त्याला वाटत होतं, सलमान कधीचं अर्पिताचं लग्न आपल्याशी लावून देणार नाही. आणि आपल्यावर खुपचं नाराज देखील होईल.

(हे वाचा:'प्रेग्नंट' नुसरत जहाँचं बोल्ड PHOTOSHOOT; वाढवलं सोशल मीडियाचं तापमान   )

मात्र धाडस करून त्याने सलमानला आपल्या आणि अलविराच्या प्रेमाबद्दल सांगितलं. आणि तेव्हा चक्क उलट झालं. सलमानला त्यांच्या नात्याबद्दल काहीचं आक्षेप नव्हता. सलमानने आपल्याकडून लग्नाला मंजुरी देवून टाकली. आणि त्यानंतर सलमानच्या सर्वच कुटुंबीयांनी अतुलला होकार दिला होता. 1996 मध्ये अतुल अलविरासोबत लग्नबंधनात अडकला होता. या दोघांनाही एक मुलगा आणि मुलगी अशी आपत्ये आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Salman khan