मुंबई, १५ जून- बॉलिवूड अभिनेता अर्जुन माथुरचं त्याच्या अभिनयासाठी नेहमीच भरभरून कौतुक केलं जातं. मेड इन हेवन या वेबसीरिजमधील त्याच्या कामाची दखलही घेतली गेली. यात त्याने ‘गे’ व्यक्तिरेखा साकारली होती. अर्जुन आपल्या व्यक्तिरेखेसोबत नेहमीच काही ना काही प्रयोग करताना दिसतो. आय एम आणि मायग्रेशन या सिनेमांत त्याने होमोसेक्शुअल व्यक्तिरेखा साकारली होती. यामुळेच आता त्याच्यासोबत चित्र-विचित्र घटना घडत आहेत.
एका मुलाखतीत, अर्जुन म्हणाला की, सोशल मीडियावर त्याच्याबद्दल बोललं जात आहे. त्याच्या लैंगिकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एवढंच नाही तर या काळात त्याला काही अश्लील मेसेजही येत असून अनेक मुलं त्याला लग्नाची मागणी घालत आहेत.
हेही वाचा- याच कारणामुळे प्रियांका चोप्राच्या दिराच्या बॅचलर पार्टीमध्ये तीनवेळा आले पोलीस
अर्जुन म्हणाला की, ‘माझ्या जवळ येऊन कोणी मला मी गे आहे की नाही असं विचारलं नाही. २०११ मध्ये आय एम आणि २००७ मध्ये मायग्रेशन या सिनेमांत काम केलं. इन्स्टाग्रामवर लोक मला अनेकदा एकच प्रश्न विचारतात की, मी गे आहे की नाही. जेव्हा मेड इन हेवन ही वेबसीरिज प्रदर्शित झाली तेव्हा अनेकांनी मला लग्नाच्याही मागण्या केल्या.’ काही दिवसांपूर्वी अनुपम खेर यांच्या द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर सिनेमात राहुल गांधी यांची व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय फरहान अख्तरच्या लक बाय चांस सिनेमातही अर्जुन माथुरने काम केलं आहे. याच सिनेमानंतर त्याच्या नावाला ओळख मिळायला लागली.
हेही वाचा- तैमुरला सोडा, लिसा रेच्या एक वर्षाच्या जुळ्या मुलींचे फोटो पाहिलेत का?
World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर पावसाचं ग्रहण