Home /News /entertainment /

Vroom! 'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लाँचसाठी 'खिलाडी' कुमारची धमाकेदार एंट्री, VIDEO पाहा

Vroom! 'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लाँचसाठी 'खिलाडी' कुमारची धमाकेदार एंट्री, VIDEO पाहा

बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘सुर्यवंशी’चा (Sooryavanshi) ट्रेलर आज प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. चित्रपटाच्या लाँचसाठी अक्षय कुमारने त्याच्या बाईवरून धमाकेदार एंट्री घेतली.

    मुंबई, 2 मार्च : बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) येत्या 24 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटाच्या ट्रेलरबाबतही सर्वांना उत्सुकता आहे. आज हा ट्रेलर प्रदर्शित होणार असून अक्षय कुमार फॅन्स अक्षरश: ट्रेलरची वाट पाहत आहेत.कतरिना कैफ या चित्रपटात अक्षयसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार सोबतच अजय देवगण, रणवीर सिंह देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ‘खिलाडी’ कुमारचा हा चित्रपट 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजता प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आज चित्रपटाच्या ट्रेलरचं लॉन्च आहे. यासाठी रोहित शेट्टीसह चित्रपटातील कलाकार दाखल झाले आहेत. मात्र आपला वेगळा अंदाज दाखवून नाही दिला तर तो खिलाडी कुमार कसला? अक्षय कुमार आजच्या दिवशीही त्याच्या हटके अंदाजात दिसला. त्याची एंट्री सुद्धा तेवढीच हटके आणि डॅशिंग होती. अक्षय कुमारने बाईकवरून लाँच असणाऱ्या ठिकाणी त्याच्या वेगळ्या स्टाईलमध्ये एंट्री केली. Reliance Entertainment ने अक्षय कुमारच्या एंट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘Vroom! Super Cop arrives in Style’ असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर अक्षय कुमारच्या फॅन्सनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. ‘या चित्रपटासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत’, ‘आता वाट पाहू शकत नाही’, अशा कमेंट्स करून प्रेक्षकांनी ‘सूर्यवंशी’साठी असणारी त्यांची उत्सुकता व्यक्त केली आहे. अन्य बातम्या दिल जीत लिया! गरीब महिलेला मदत करताना मलायकाचा फोटो VIRAL ब्रेकअपनंतर नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंड अनोखा अंदाज, VIDEO VIRAL
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Akshay Kumar, Rohit Shetty

    पुढील बातम्या