Home /News /entertainment /

आता पूरग्रस्तांसाठी धावला अक्षय कुमार; भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

आता पूरग्रस्तांसाठी धावला अक्षय कुमार; भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने आसाममधी पूरग्रस्तांना 1 कोटींची मदत देऊ केली आहे.

    दिसपूर, 18 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने आसाममधी पूरग्रस्तांना 1 कोटींची मदत देऊ केली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal) यांनी मंगळवारी ट्वीट करून यासंदर्भात अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'आसाममध्ये पूर सहाय्यता निधीसाठी 1 कोटींची मदत केल्याबद्दल अक्षय कुमारजींचे धन्यवाद. तुम्ही संकटकाळात नेहमी सहानुभूती आणि पाठिंबा दिला आहे. आसामचा एक चांगला मित्र म्हणून, जागतिक स्तरावर तुमची प्रतिमा उंचावण्यासाठी देव कायम तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करो.' जुलै 2020 मध्ये एकाच वेळी आसामचे 33 जिल्हे पाण्याखाली होते. पूरस्थितीमुळे जवळपास 28 लाख लोकं प्रभावित झाले आहेत. यावेळी हजारो घरं पुरबाधित झाली आहेत, शेतीचे नुकसान झाले आहे आणि अनेक ठिकाणचे पूल-रस्ते तुटले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व इतर सरकारी संस्था व स्वयंसेवी संस्था पूर मदत कार्यात व्यस्त आहेत. (हे वाचा-प्रभासच्या आणखी एका मोठ्या सिनेमाची घोषणा,तान्हाजी फेम ओम राऊतचं असणार दिग्दर्शन) आसाममध्ये महिन्यापेक्षा जास्त काळ पूर परिस्थिती आहे.  मागील महिन्यात झालेल्या भीषण पूरातून दशलक्षाहूनही अधिक लोक प्रभावित झाले होते. बिहारमध्येही पुराचा सामना करावा लागत आहे. यावेळी भारतातील बर्‍याच राज्यांत मुसळधार पावसाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. विशेषत: महाराष्ट्रात धरणं अतिवृष्टीमुळे ओसंडून वाहत आहे. हे पाहता पुण्यातील खडकवासला धरणातून देखील पाणी सोडावे लागले.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Akshay Kumar

    पुढील बातम्या