Home /News /entertainment /

अक्षय कुमारने यूट्यूबरवर केला 500 कोटींच्या मानहानीचा दावा; सुशांत मृत्यूप्रकरणी केले होते गंभीर आरोप

अक्षय कुमारने यूट्यूबरवर केला 500 कोटींच्या मानहानीचा दावा; सुशांत मृत्यूप्रकरणी केले होते गंभीर आरोप

यूट्यूबरने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अक्षय कुमारवर अनेक गंभीर आरोप लावले होते. त्यानंतर आता अक्षयने यूट्यूबर राशिद सिद्दिकीविरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

    मुंबई, 19 नोव्हेंबर : बॉलिवूड 'खिलाडी' अक्षय कुमारने (Akshay Kumar) एका यूट्यूबरला (YouTuber) 500 कोटींच्या मानहानीची (defamation) नोटिस पाठवली आहे. यूट्यूबरने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput death case) अक्षय कुमारवर अनेक गंभीर आरोप लावले होते. त्यानंतर आता अक्षयने यूट्यूबर राशिद सिद्दिकीविरोधात (Rashid Siddiqui) 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. रिया चक्रवर्तीची मदत केल्याचा आरोप - मिड डेने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, यूट्यूबर राशिद सिद्दिकीने आपल्या एका व्हिडिओमध्ये दावा केला होता की, अक्षय कुमार, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) मदत करत आहे. एवढंच नाही तर, सिद्दिकीने असंही म्हटलं होतं की, अक्षयने रिया चक्रवर्तीला देशातून बाहेर कॅनडा पाठवण्यासाठी मदत केली होती. तसंच सुशांत मृत्यूप्रकरणी अक्षय कुमारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी गुप्त चर्चा केल्याचा आरोपही सिद्दिकीने आपल्या व्हिडिओमध्ये केला होता. अक्षय कुमार, सुशांतच्या एम.एस धोनी (MS Dhoni) चित्रपटाच्या यशामुळे खूश नसल्याचाही आरोप सिद्दिकीने केला होता. मिळालेल्या रिपोर्टनुसार, यूट्यूबर राशिद सिद्दिकी या व्हिडिओमधून आतापर्यंत 15 लाख रुपये कमावले आहेत. बिहारचा राहणारा राशिद व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहे. त्याचं एफएफ न्यूज नावाने यूट्यूब चॅनल आहे. या व्हिडिओमुळे त्याच्या यूट्यूब सब्सक्रायबर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. यूट्यूबर राशिद सिद्दिकीला पोलिसांनी याआधीही सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी दिशाभूल करणाऱ्या बातम्या परवल्याबाबत आणि या प्रकरणात मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंचं नाव घेतल्याबाबत अटक करण्यात आली होती.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Akshay Kumar, Bollywood, Sushant sing rajput

    पुढील बातम्या