मुंबई, 30 जानेवारी: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला (Akshay kumar) आज बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवून 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. एका सामान्य घरातून आलेला अक्षय कुमार गेल्या तीस वर्षांपासून आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. चित्रपट विश्वातील त्याची कारकीर्द खूपच यशस्वी राहिली आहे. अगदी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवण्यापासून सुरू झालेला त्याचा संघर्ष राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतरही संपला नाही. यावेळी त्यानं म्हटलं की, 'चित्रपट सृष्टीत प्रवेश करणं खूप कठिण बाब आहे, पण चित्रपट सृष्टीत टिकूण राहणं त्याच्यापेक्षाही अवघड आहे. चित्रपट सृष्टीत तुम्हाला तुमची जागा शाबूत ठेवणं हे खूप आव्हानात्मक आहे.
ANI या वृत एजन्सीला बोलताना अक्षय म्हणाला की, 'बॉलिवूडमध्ये पाय रोवून घट्ट उभं राहणं, सर्वांसोबत संबंध ठेवत समतोल राखणं, खरंच सोपं नाही. काम भेटायला तर अडचणी येतातच. पण एकदा काम भेटल्यानंतर बॉलीवूडमध्ये टिकून राहणं, यामध्ये एक मोठा संघर्ष आहे. बॉलीवूमध्ये इतके वर्ष काम केल्यानंतरही मी वडीलांनी दिलेला सल्ला नेहमी लक्षात ठेवतो. वडील म्हणाले होते की, 'कठोर परिश्रम घेत राहायचं, उद्याची चिंता करायची नाही. त्यानंतर सर्व गोष्टी आपोआप चांगल्या व्हायला लागतात.'
अक्षयने त्याच्या तीस वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत प्रत्येक प्रकारचा चित्रपट केला आहे. अॅक्शन, रोमॅंटीक, कॉमेडीपासून ते देशभक्ती पर्यंत अशा अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा त्याने चित्रपटात साकारल्या आहेत. अक्षयच्या प्रत्येक व्यक्तिरेखेला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच कदाचित अक्षय गेली 30 वर्षे बॉलीवूडमध्ये टिकून आहे.
अक्षय कुमारच्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक चढ उतार आले आहेत. अनेकदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. अशा अपयशांनी खचून न जाता, त्याने कठोर मेहनत घेवून बॉलीवूडमधलं आपलं स्थान भक्कम केलं आहे. बदलत्या काळानुसार अक्षयने स्वतः मध्ये अनेक बदल केले आहेत. नवीन गोष्टी शिकण्यासाठी अक्षय कधीही मागे हटला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood News