Home /News /entertainment /

'त्या'जाहिरातीबद्दल खिलाडी अक्षय कुमारने मागितली फॅन्सची माफी, मोठा निर्णय घेत म्हणाला, 'मी यापुढे...'

'त्या'जाहिरातीबद्दल खिलाडी अक्षय कुमारने मागितली फॅन्सची माफी, मोठा निर्णय घेत म्हणाला, 'मी यापुढे...'

Akshay Kumar

Akshay Kumar

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच तो एका जाहिरातीत झळकला होता. त्यामुळे तो चांगलाच विवादात सापडला होता. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 एप्रिल-  बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता अक्षय कुमार   (Akshay Kumar)  गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच तो एका गुटख्याच्या जाहिरातीत झळकला होता. त्यामुळे तो चांगलाच विवादात सापडला होता. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती.या जाहिरातीत शाहरुख खान आणि अजय देवगनसुद्धा दिसले आहेत. मात्र याबाबत अक्षयला चाहत्यांचा प्रचंड रोष सहन करावा लागला होता. या सर्व प्रकारानंतर आता अक्षय कुमारने ट्विट करत सर्वांची माफी मागितली आहे. खिलाडी कुमारने या सर्व प्रकाराबाबत एक भलंमोठं ट्विट केलं आहे. अक्षयने ट्विट करत आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे. त्याने ट्विट करत लिहिलं आहे, ''माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची मी माफी मागतो. गेल्या काही दिवसांत तुमच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनी मला प्रचंड प्रभावित केलं आहे. मी कधीही तंबाखूसारख्या ब्रँडची जाहिरात केलेली नाहीय. आणि यापुढेसुद्धा करणार नाही. तथापि माझ्या विमल इलायचीच्या जाहिरातीनंतर आलेल्या तुमच्या भावनांची मी रिस्पेक्ट करतो. आणि मी नम्रपणे यातून माघार घेतो. अक्षय कुमारने पुढे लिहिलंय, 'या जाहिरातीतून मिळालेली सर्व रक्कम मी एका चांगल्या कामासाठी खर्च करेन. परंतु माझ्या या माफीनाम्यानंतरसुद्धा हा ब्रँड माझी ही जाहिरात दाखवत राहणार. माझा करार जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते लोक ही जाहिरात चालवणार. परंतु यापुढे मी कोणतीही जाहिरात निवडताना अगदी सतर्क राहीन. याबद्दल मला तुमचं प्रेम आणि शुभेच्छा हव्या असतील'. असं म्हणत अक्षयने आपली बाजू स्पष्ट केली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Akshay Kumar, Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या